वृत्तसंस्था
अलीगड : भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांची तुलना भगवान श्रीरामाशी करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद हे पुरते फसले आहेत. त्यांना आपल्याच वक्तव्यावरून पुनःपुन्हा खुलासे करावे लागत आहेत. Salman Khurshid engulfs himself in his own Controversial statements on Rahul Gandhi
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 3 दिवस उत्तर प्रदेशात असणार आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खुर्शीद यांनी, आधी रामाच्या खडावा येतील. भरताने जशा रामाच्या खडावा आणल्या तशा आम्ही खडावा आणू. मग आमचे श्रीराम येतील. म्हणजे राहुल गांधी येतील, असे वक्तव्य केले होते. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधी हे योग्यासारखी तपस्या करत आहेत. त्यांच्या तपस्येला निश्चितच फळ प्राप्त होईल. ते सुपर ह्यूमन आहेत. आम्ही इथे थंडीत कुडकुडत असताना ते फक्त टी-शर्ट घालून भारत जोडो यात्रेत फिरत आहेत, अशी स्तुतिसुमने देखील उधळली होती.
त्यानंतर सलमान खुर्शीद यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका सुरू झाली. त्यावेळी त्यांनी वक्तव्य थोडे बदलले. काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. काँग्रेस संघटनेसाठी ते खूप कष्ट घेत आहेत. पण काँग्रेसचे प्रमुख नेते गांधी परिवारातूनच येतात. त्यामुळे खर्गेजींचे नेते देखील गांधी परिवारातलेच आहेत, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
या वक्तव्यावरून देखील खुर्शीद यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. त्यानंतर अलीगडमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपले वक्तव्य बदलले. मी खडावा घेऊन येणार आहे असे म्हटल्यावर त्या रामाच्याच खडावा असतील असे समजण्याचे कारण नाही. मी कोणाचीही तुलना श्रीरामाशी केली नाही आणि करू शकत नाही, असे सलमान खुर्शीद अलीगड मध्ये म्हणाले.
– सलमान खुर्शीदांची कारकीर्द उत्तम, पण…
वास्तविक सलमान खुर्शीद हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते. तेव्हाचे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या समवेत संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी पाकिस्तान वर कूटनीतीमध्ये मात करून दाखविली होती. त्यावेळी त्यांच्या बुद्धी कौशल्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली होती.
पण नंतर सलमान खुर्शीद हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला तिथे चांगला राजकीय परफॉर्मन्स दाखवत आला नाही आणि आता तर सलमान खुर्शीद हे स्वतःच्याच राजकीय वक्तव्यामध्ये एवढे गुरफटले आहेत की त्यांना आपल्याच वक्तव्यांसंदर्भात दररोज वेगवेगळे खुलासे करावे लागत आहेत.
Salman Khurshid engulfs himself in his own Controversial statements on Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- शिजानच्या नादी लागून तुनिषा हिजाब घालू लागली होती; शिजानच्या आई – बहिणीबरोबरचे मोबाईल चॅट पोलीसांच्या हाती
- माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य; 100 व्या वर्षातील पदार्पणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिला होता भावनिक ब्लॉग
- पवार काँग्रेस भवनात, अब्दुल्ला, मुफ्ती भारत जोडो यात्रेत; केंद्रात काँग्रेसचे वर्चस्व मान्यतेच्या दिशेने
- केंद्रात मोदी विरोधी आघाडी उघडण्याचा मनसूबा राखणारे केसीआर म्हणाले, मी मोदींचा बेस्ट फ्रेंड!; नेमका अर्थ काय?