• Download App
    सलमान खानला स्वसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांनी दिला बंदुकीचा परवाना!! Salman Khan has been issued a gun license by the Mumbai police for self-defense

    सलमान खानला स्वसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांनी दिला बंदुकीचा परवाना!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला स्वसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांनी बंदुकीचा परवाना दिला आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानने मुंबई पोलिसांकडे स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना मिळवण्याचा अर्ज केला होता. तो मुंबई पोलिसांनी मंजूर केला आहे. Salman Khan has been issued a gun license by the Mumbai police for self-defense

    सलमान खानने बंदुकीच्या परवान्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची देखील भेट घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून 5 जून 2022 ला सलमान खानला मारण्याची धमकी आली. त्यानंतर सलमान खान आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेविषयी अधिक अलर्ट झाला. त्याने आपली लँड क्रूजर गाडी बुलेटप्रूफ देखील बनवून घेतली आणि स्वसंरक्षणासाठी ताबडतोब बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. तो आता मुंबई पोलिसांनी मंजूर केला आहे.

    काळवीटाच्या शिकारीचा खटला

    हाच तो सलमान खान आहे, ज्याच्या विरुद्ध राजस्थान मध्ये काळविटाची शिकार केल्याचा खटला सुरू आहे. बिश्नोई समाजात काळवीटाला पवित्र मानले जाते. या पार्श्वभूमीवर सलमान खानने काळवीटाची शिकार केल्यानंतर देखील त्याला धमक्या आल्या होत्या. परंतु पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केली. त्यानंतर सलमान खानला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेविषयीचे गांभीर्य वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी त्याला स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना दिला आहे.

    Salman Khan has been issued a gun license by the Mumbai police for self-defense

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!