वृत्तसंस्था
कोलकाता : महाकवी रवींद्रनाथ टागोर लंडनमध्ये राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. तिच्या खरेदीची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखविली आहे. भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत २,६९९,५०० डॉलर म्हणजेच २७.३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.Rabindranath Tagore’s London house up for sale ta showed readiness to buy
१९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते. २०१५ मध्ये लंडन दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
२०१५ मध्ये लंडनच्या पहिल्या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “टागोर ज्या घरी राहत होते, ते घर खरेदी करण्यास आमचे सरकार उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत. ही एक खासगी मालमत्ता आहे म्हणून, मी माझे उच्चायुक्त (त्या वेळी रंजन मथाई) यांना विचारले होते की आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का. त्यावेळी ही मालमत्ता विकली जाणार नव्हती, पण आता त्याची किंमत ठरवण्यात आली आहे.
या घरावर नील फलक लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असे त्यावर लिहिले आहे. हा फलक लंडन कंट्री कौन्सिलने लावली होता. आता या घराची जबाबदारी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टवर आहे.
टागोर वगळता इतर काही भारतीय नेत्यांचीची नावे असलेले नील फलकही लंडनमध्ये लावण्यात आले आहेत. ज्यात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, योगी अरविंद घोष, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि व्ही. के. कृष्ण मेनन यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल सरकारने हे घर खरेदी करण्यास उत्सुकता दाखवल्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती स्वराज पॉल यांनी आनंद व्यक्त केलाय. ते म्हणाले की, हे घर भारत सरकार किंवा पश्चिम बंगाल सरकार खरेदी करू शकते.
२०१५ मध्ये, जेव्हा ममता बॅनर्जी लंडनला गेल्या, तेव्हा स्वराज पॉल यांनी त्यांना चहासाठी आमंत्रित केले होते. पॉल म्हणाले की, टागोर बिल्डिंग खरेदी करण्यासाठी सरकार एक समितीही बनवू शकते आणि जर त्यात माझा समावेश असेल तर मला आनंद होईल, असेही ते म्हणाले.
घराचा इतिहास..
ट्रस्टच्या मते हिथवरील घर क्रमांक ३ मध्ये १९१२ वर्षात उन्हाळ्यात काही महिने रवींद्रनाथ टागोर इथे राहायचे. लंडनच्या तिसऱ्या भेटीदरम्यान ते येथे राहिले होते. त्या वेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था कलाकार आणि लेखक सर विल्यम रोथेनस्टाईन यांनी केली होती. सर विल्यम तेव्हा ११ ओक हिल पार्क मध्ये राहत होते. मात्र, आता त्यांचे निवासस्थान पाडले गेले आहे.
Rabindranath Tagore’s London house up for sale
महत्त्वाच्या बातम्या
- सोनू सूदवरील प्राप्तिकर छाप्यांचा तपास राजस्थानच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला, 175 कोटींच्या संशयास्पद व्यवहाराचा खुलासा
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता