विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: शनिवारी १८ सप्टेंबर रोजी साहित्य अकादमीने मानाचा फेलोशिप पुरस्कार व २०२० अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले प्रसिद्ध मराठी लेखक भालचंद्र नेमाडेना सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर झालेली आहे. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी अनुवादासाठी पुरस्कार देण्यात आला.
Sahitya Academy Award 2020, Bhalchandra Nemade won honorary fellowship award and Maharashtra won 2 awards
भालचंद्र नेमाडे यांची आत्तापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी लंडनमधील ‘स्कूल ऑफ ओरिअंटल अॅन्ड आफ्रिकन स्टडीज’ सारख्या विद्यापीठांमध्ये मराठी, इंग्रजी व तौलानिक साहित्याचा अभ्यास केलेला आहे. ताम्रपत्र आणि शाल या स्वरुपात मानाची फेलोशिप हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.
मध्यरात्रीनंतरचे तास’ या तामीळ भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या कादंबरीसाठी सुप्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रकाशमार्गा: या संस्कृतमधील अनुवादित पुस्तकाकरीता प्रसिद्ध लेखिका मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवाद पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानचिन्ह, ५० हजार रूपये व ताम्रपत्र अशा स्वरुपात वितरण करण्यात येईल.
Sahitya Academy Award 2020, Bhalchandra Nemade won honorary fellowship award and Maharashtra won 2 awards
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप