वृत्तसंस्था
सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरची पोलिंग ऑफिसर ईशा अरोडा पुन्हा एकदा सोशल मीडियावर जबरदस्त हिट झाली आहे. सहारनपूर लोकसभा मतदारसंघात ईशा अरोडा यांची ड्युटी लागली असून त्यांनी आपले काम वेळेत सुरू केले. त्यांचा निवडणुकीच्या कामकाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2022 त्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत देखील ईशा अरोडा या पोलिंग ऑफिसरच होत्या. त्यावेळी पासूनच त्या सोशल मीडियावर सुपरहिट आहेत. Saharanpur polling officer Isha Arora hit again on social media
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपुर लोकसभा मतदारसंघात त्यांची ड्युटी पोलिंग ऑफिसर म्हणूनच लागली. निवडणुकीची सामग्री घेऊन अन्य अधिकाऱ्यांसमवेत त्या आपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त हिट झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने ईशा अरोडा यांची दखल घेतली आणि त्या जिथे पोलिंग ऑफिसर म्हणून ड्युटी करत आहेत तिथे त्यांचे कॅमेरामन पोहोचले.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ईशा आरोडा यांनी मनोगत व्यक्त केले.आपले काम वेळेत सुरू करा, ते चोख पार पाडा, कुठलेही काम हलके समजू नका. देशात एवढी मोठी निवडणूक पार पडते आहे. ते अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या साह्यानेच घडून येत आहे. देशातील नागरिकांचे त्यांना चांगले सहकार्य मिळते आहे. लोकांनी जास्तीत जास्त पुढे येऊन मतदान केले पाहिजे, असे आवाहन ईशा अरोडा यांनी केले.
Saharanpur polling officer Isha Arora hit again on social media
महत्वाच्या बातम्या
- 21 राज्ये, 102 जागा आणि 16 कोटी मतदार… लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, या 15 जागांवर देशाचे लक्ष
- आपचे आमदार अमानतुल्ला यांची वक्फ बोर्डप्रकरणी ईडीकडून 9 तास चौकशी, 32 जणांच्या अवैध नियुक्तीचा आरोप
- हैदराबादेत मतदार याद्यांचे कायदेशीर शुद्धीकरण; तब्बल 5,41,201 मतदारांची नावे टाकली वगळून; घ्या अर्थ समजून!!
- मनीष सिसोदियांना धक्का, कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवली