• Download App
    सगेसोयरे ही भेसळ; जरांगे 31 खासदारांच्या आणि श्रीमंत मराठ्यांच्या की गरीब मराठ्यांच्या बाजूने??; आंबेडकरांचा सवाल!!|Sagesoyere is adulterous; In favor of Jarange 31 MPs and rich Marathas or poor Marathas??; Ambedkar's question!!

    सगेसोयरे ही भेसळ; जरांगे 31 खासदारांच्या आणि श्रीमंत मराठ्यांच्या की गरीब मराठ्यांच्या बाजूने??; आंबेडकरांचा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत मनोज जरांगे यांची बाजू उचलून धरणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता सगेसोयरे या मुद्द्यावर थेट मनोज जरांगे यांनाच सवाल केला आहे. तुम्ही निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या 31 खासदारांच्या बाजूने आणि श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहात की गरीब मराठ्यांच्या बाजूने आहात??, हे ठरवावे लागेल, असे परखड बोल प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना ऐकवले.Sagesoyere is adulterous; In favor of Jarange 31 MPs and rich Marathas or poor Marathas??; Ambedkar’s question!!

    प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. यात्रा 25 जुलैपासून दादरच्या चैत्यभूमीवरून सुरू होईल आणि संभाजीनगर मध्ये संपेल.



     प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असं ओबीसींचं मत होत आहे. हे सर्व लोक श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असं ओबीसींना वाटतंय. हा धोका आहे. दुसरीकडे जरांगे म्हणत आहेत की, आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कोणतंही सरकार निर्णय घेणार नाही.

    मनोज जरांगे यांचं आंदोलन गरीब मराठ्यांचं आंदोनल आहे. गरीब मराठे मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहे. पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. त्यांचं आंदोलन कुठे जाईल, कसं जाईल हे सांगता येत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलनं ही श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झालं पाहिजेत. मनोज जरांगे यांचे आंदोलन भरकटलंय असं म्हटलं नाही. म्हणणार नाही. पण मनोज जरांगे यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ते श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत की, महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या 31 खासदारांसोबत आहेत की गरीब मराठ्यांसोबत आहेत??, हे मनोज जरांगे यांना जाहीर करावे लागणार आहे.

    सगेसोयरे ही भेसळ

    महाराष्ट्रात श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे. ते श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळूच नये असा त्यांचा प्रयत्न आहे. याचा तोडगा मी आता मांडणार नाही. आत्ता तोडगा मांडला तर श्रीमंत मराठे त्याचा खिमा करतील. सत्ता आल्यावर तोडगा देईल. पण आता भेसळ करण्याचा भाग सुरू आहे. सगेसोयरे ही भेसळ आहे. प्रत्येक पार्टीला पत्र लिहा या दोन विषयावर. जरांगेची मागणी आहे, मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्या आणि सगेसोयऱ्यांबाबतची भूमिका काय हे राजकीय पक्षांना पत्रातून कळवा!!

    Sagesoyere is adulterous; In favor of Jarange 31 MPs and rich Marathas or poor Marathas??; Ambedkar’s question!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!