• Download App
    मथुरेतील सफेद भवन हिंदूंना सोपवावे, उत्तर प्रदेशचे आनंद स्वरूप शुक्लांचे आवाहन|Safed Bhavan in Mathura should be handed over to Hindus, Anand Swarup Shukla of Uttar Pradesh appeals

    मथुरेतील सफेद भवन हिंदूंना सोपवावे, उत्तर प्रदेशचे आनंद स्वरूप शुक्लांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    बलिया : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील सफेद भवन हिंदूंना सोपवावे, असे आवाहन उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे. अयोध्येचा मुद्दा न्यायालयाने सोडवला असला तरी, काशी (वाराणसी) आणि मथुरेतील सफेद बांधकाम हे हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे, असे त्यांनी या दोन्ही ठिकाणी असलेल्या मुस्लिमांच्या धार्मिक वास्तूंचा उल्लेख करताना सांगितले.Safed Bhavan in Mathura should be handed over to Hindus, Anand Swarup Shukla of Uttar Pradesh appeals

    हिंदूंच्या भावना दुखावणारे मथुरेतील सफेद भवन न्यायालयाच्या मदतीने हटवण्याची वेळ येईल. राम आणि कृष्ण हे पूर्वज होते आणि बाबर, अकबर व औरंगजेब आक्रमक होते, यावर मुस्लिमांनी विश्वास ठेवावा, असे राम मनोहर लोहिया यांनी सांगितले होते. त्यांनी केलेल्या बांधकामांवर तुम्ही स्वत:ला जोडू नका, असे शुक्ला यांनी पत्रकारांसोबत चर्चा करताना सांगितले.



    उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. ही घरवापसी असल्याचे सांगून स्वरुप म्हणाले, मुसलमानांना वसीम रिझवी यांचे अनुकरण करायला हवे. देशातील सर्वच मुसलमान हे धर्मांतरीत आहेत.

    त्यांनी आपला इतिहास पाहिला तर लक्षात येईल की दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी ते हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात आले आहेत. आम्हाला असे वाटते की प्रत्येकाची घरवापसी व्हावी. भारताची मुळ संस्कृती ही हिंदू असून भारतीयता आहे. या दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.

    समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह आणि अध्यक्ष अखिलेश सिंह हे हिंदूविरोधी असल्याचा आरोप करून स्वरुप म्हणाले, त्यांनी अयोध्येतील निशस्त्र कारसेवकांवर गोळीबार केला होता.

    Safed Bhavan in Mathura should be handed over to Hindus, Anand Swarup Shukla of Uttar Pradesh appeals

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Hindenburg : हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीची अदानींना क्लीन चिट; अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंगचा आरोप, मार्केट व्हॅल्यू 1 लाख कोटींनी कमी झाले

    Anil Ambani : अनिल अंबानींविरुद्ध सीबीआयने दाखल केले आरोपपत्र; येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावरही 2,796 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

    Online Gaming : 1 ऑक्टोबरपासून नवीन ऑनलाइन गेमिंग कायदा लागू; IT मंत्री म्हणाले- आम्ही प्रथम गेमिंग उद्योगाशी चर्चा करू