वृत्तसंस्था
कोलंबो : एशिया कप मध्ये भारत – पाकिस्तान मुकाबल्याची संडे फीस्ट मिळण्याऐवजी प्रेक्षकांना मंडे फिस्ट मिळाली. पाकिस्तानी संघाची धुलाई करत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा 13000 धावांचा विक्रम मोडला, तर के. एल. राहुलने सहा महिन्यांनंतर कमबॅक करत शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य कोलंबोत उंचावले. भारत आणि पाकिस्तान पुढे 50 षटकांमध्ये 357 धावांचे आव्हान ठेवले आहे. Sachin’s record break from Virat with pakistan cricket match
कोलंबोत भारत – पाकिस्तान सामन्याचे काल रविवारी प्रेक्षकांना संडे फिस्ट मिळणार होती. पण पावसाने त्यावर पाणी फेरले. त्यामुळे आज उर्वरित सामना खेळवला गेला आणि भारतीय फलंदाजांनी कमाल केली. रोहित शर्मा 76, शुभमन गिल 58 तर विराट कोहली नाबाद 122 के. एल. राहुल नाबाद 111 अशी सर्वांनी मिळून पाकिस्तानची धुलाई गेली. विराटने शानदार शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या फास्टेस्ट 13000 धावांचा विक्रम ओलांडला. विराटने 84 चेंडूत 100 धावा केल्या. त्यामुळे मंडे फिस्टच्या आनंदात आणखीच भर पडली.
हा सामना अद्याप सुरू असून आता पाकिस्तान फलंदाजीला उतरला आहे. त्यांच्यासमोर भारतीय गोलंदाज कसा प्रभाव टाकतात हे पहाणे महत्त्वाचे आहे.
Sachin’s record break from Virat with pakistan cricket match
महत्वाच्या बातम्या