विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भगवान कल्की मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अन्य भाजप नेत्यांना निमंत्रण देणाऱ्या आचार्य प्रमोद कृष्णन यांना काँग्रेस पक्षाला बेशिस्ती बद्दल निलंबित केले, पण प्रमोद कृष्णन यांनी काँग्रेस नेत्यांच्या पोलखोलीचे काम सोडलेले नाही.Sachin Pilot, Priyanka Gandhi also insulted in Congress, Kharge rubber stamp President; Attack of Acharya Pramod Krishnan!!
सनातन धर्माबद्दल मी चांगले बोललो म्हणून मला काँग्रेस मधून निलंबित केले असले तरी मी धर्माचे काम सोडणार नाही, असा निर्वाळा प्रमोद कृष्णन यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये सचिन पायलट, प्रियंका गांधी यांचा देखील अपमान होतो आहे. सचिन पायलट तर भगवान शिवा सारखे विष प्राशन करून काँग्रेसमध्ये राहिले आहे, असा दावा केला.
प्रियांका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस केल्यानंतर त्यांच्या पदापुढे “सरचिटणीस : विदाऊट पोर्टफोलिओ”, असे लिहिले होते. आजपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला पदावर नेमल्यानंतर त्याच्याकडे कोणते कामच दिले नव्हते, असे कधी घडले नव्हते, ते प्रियांका गांधी यांच्या बाबतीत घडले. हे सगळे कोणी घडवले??, याचा तुम्हीच विचार करा आणि काँग्रेस श्रेष्ठींना तुम्हीच प्रश्न विचारा, असे प्रमोद कृष्णन यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचवेळी प्रमोद कृष्णन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर ते रबर स्टॅम्प असल्याचा शिक्का मारला.
Sachin Pilot, Priyanka Gandhi also insulted in Congress, Kharge rubber stamp President; Attack of Acharya Pramod Krishnan!!
महत्वाच्या बातम्या
- महिला – मुलांना ढाल बनवून मुस्लिमांनी रचली हल्दवानी हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी; वाचा जखमी कर्मचाऱ्याची जबानी!!
- मिथुन चक्रवर्तींना छातीत दुखू लागल्याने केले रुग्णालयात दाखल
- EPFO: 2023-24 साठी व्याजदर निश्चित, खातेदारांना आता इतका परतावा मिळेल
- लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात CAA लागू होणार