• Download App
    हायकमांडकडून सचिन पायलटांचा अपमान; गुज्जर समाजाची नाराजी काँग्रेसला राजस्थानात 40 जागांचा फटका देणार!!|Sachin Pilot insulted by high command; The displeasure of the Gujjar community will hit Congress with 40 seats in Rajasthan!!

    हायकमांडकडून सचिन पायलटांचा अपमान; गुज्जर समाजाची नाराजी काँग्रेसला राजस्थानात 40 जागांचा फटका देणार!!

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : हायकमांड कडून सचिन पायलट यांचा अपमान गुजर समाजाची नाराजी काँग्रेसला राजस्थानात 40 जागांचा फटका देणार, अशी स्थिती राजस्थान आली आहे. भले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात सचिन पायलट यांच्यावर दोनदा मात करून आपले मुख्यमंत्रीपद टिकवले असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय राजकारणाची सोय म्हणून काँग्रेस जातनिहाय जनगणनेची मागणी करून भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असेल तरी देखील प्रत्यक्षात राजस्थानातील जातीच्या समीकरणात गुज्जर समाजाची नाराजी काँग्रेसलाच तब्बल 40 जागांचा फटका देण्याची दाट शक्यता आहे.Sachin Pilot insulted by high command; The displeasure of the Gujjar community will hit Congress with 40 seats in Rajasthan!!



    अशोक गहलोत यांची राजकीय वर्तणूक आणि काँग्रेस हायकमांडचे सचिन पायलट यांच्याकडे दुर्लक्ष या दोन बाबी यासाठी कारणीभूत असणार आहेत. गुज्जर समाजाचे दुसऱ्या – तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते ही बाब उघडपणे बोलून दाखवत आहेत.

    राजस्थानामध्ये 8 जिल्हे असे आहेत, की जिथे गुज्जर समाज आपली राजकीय साख राखून आहे. त्या समाजाच्या मतांवर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे राजकीय भवितव्य अवलंबून असते. जयपूर, अलवर, दौसा, भरतपूर, करौली, सवाई माधोपूर, टोंक आणि झालवाड या 8 जिल्ह्यांमध्ये 40 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यामध्ये गुज्जर समाजाचा प्रभाव आहे. राजस्थानातले बडे नेते राजेश पायलट यांचे हे प्रभावक्षेत्र आहे. त्यांचे पुत्र सचिन पायलट यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष करून प्रचारात त्यांचा भरपूर वापर केला सचिन पायलट पायाला भिंगरी लावून संपूर्ण राजस्थानात फिरले तरुणाईची मते काँग्रेसच्या बाजूने फिरवली. पण प्रत्यक्ष काँग्रेस सत्तेवर येताच काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांना बाजूला सारले. अशोक गेहलोत यांना अतिरिक्त महत्त्व दिले.

    अशोक गेहलोतांनी सचिन पायलट यांना राजस्थानच्या राजकारणात मार्जीनालाईज करून ठेवले. त्यांच्यासारख्या तरुण नेत्यावर हा अन्याय झाला आहे, ही भावना गुज्जर समाजात खोलवर रुजली आहे आणि त्यामुळेच गुज्जर समाज यावेळी काँग्रेसच्या विरोधात मतदान करून पक्षाला तब्बल 40 जागांचा फटका देण्याच्या बेतात आहे.

    Sachin Pilot insulted by high command; The displeasure of the Gujjar community will hit Congress with 40 seats in Rajasthan!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य