• Download App
    कोविडच्या ओमिक्रॉनच्या आणि डेल्टा रुग्णांची त्सुनामी येण्याची भीती, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा|s omikron and delta patients tsunami, health system may collapses, WHO warns

    कोविडच्या ओमिक्रॉनच्या आणि डेल्टा रुग्णांची त्सुनामी येण्याची भीती, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोविडच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा रुग्णांची संख्याच वाढणार नसून त्सुनामी येणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. त्यामुळे ताण येऊन आरोग्य सुविधा कोलमडण्याची भीती असल्याचा इशाराही दिला आहे.s omikron and delta patients tsunami, health system may collapses, WHO warns

    आरोग्य व्यवस्थांवर अगोदरपासूनच खूप ताण आला आहे. त्यांचा कमाल मर्यादेपर्यंत वापर झाला आहे. त्यातच आता ओमिक्रॉन आणि डेल्टा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रॉनने दुहेरी चिंता वाढविली आहे. त्यामुळे नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे



    हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात जगातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अकरा टक्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांत विक्रमी संख्येने रुग्ण सापडले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    ओमिक्रॉन, डेल्टा प्रमाणेच प्रसारित होणारा कोरोनाचा प्रकार आहे. त्यामुळे एखाद्या त्सुनामीप्रमाणे रुग्ण वाढत असून त्यामुळे काळजी वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच केवळ नव्या रुग्णांमुळे नव्हे आरोग्य कर्मचारीच आजारी पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा दबाव वाढत आहे.

    कोणतेही राष्ट्र साथीच्या आजारातून बाहेर पडण्याचा मार्ग काढू शकत नाही. मात्र, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशातील किमान ४० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हायला हवे. २०२२ च्या मध्यापर्यंत हे प्रमाण ७० टक्यांपर्यंत वाढवायला हवे.

    टेड्रोस म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या १९४ देशांपैकी ९२ देशांना लसीकरणाचे लक्ष्य गाठता येणार नाही. याचे कारण म्हणजे बहुतांश देशांमध्ये मर्यादित पुरवठा आहे. लसी कालबाह्य होत आहेत. सिरिंजचा तुटवडा आहे.

    जागतिक पातळीवर आणि अमेरिकेत गेल्या सात दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी उच्चांक गाठला आहे. याचे कारण म्हणजे नवीन ओमिक्रॉन विषाणू नियंत्रणाबाहेर गेल आहे.

    सध्या युरोपमध्ये आणि जगभरातील अनेक देशांमध्ये आढळलेल्या प्रकरणांच्या प्रचंड संख्येमुळे लसीकरणाकडे केलेले दूर्लक्ष कारणीभूत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले.

    s omikron and delta patients tsunami, health system may collapses, WHO warns

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक