वृत्तसंस्था
जिनिव्हा : S Jaishankar: “इंडी” आघाडीचे सरकार आल्यास जनतेच्या बॅंक खात्यात खटाखट पैसे जमा होतील, असे उथळ वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची राळ उडवून दिली होती. त्यावरून आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांना टोला हाणला. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही. ते खडतर आहे, इथे कठोर मेहनत घ्यावी लागते, असे जयशंकर म्हणाले. जिनिव्हा येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधींच्या खटाखट वक्तव्याचे वाभाडे काढले. S Jaishankar
नेमकं काय म्हणाले एस.जयशंकर?
एस. जयशंकर यांनी जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. काही लोक चीनमधून केलेल्या आयातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आपण चीनकडून इतकी आयात का करतो, असं विचारलं जातं. मात्र, 1960 ते 1990 च्या काळातील सरकारांनी कधीही उत्पादनाकडे लक्ष दिले नाही. आज जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा करतो, तेव्हा आमच्याकडे संसाधने नाहीत त्यामुळे आम्ही उत्पादन क्षेत्राकडे वळू शकत नाही, असं सांगितलं जातं. मुळात जोपर्यंत उत्पादन क्षेत्र मजबूत होत नाही, तोपर्यंत तुम्ही जागतिक महासत्ता बनू शकत नाही, असे परखड मत शी त्यांनी व्यक्त केले. S Jaishankar
राहुल गांधींना लगावला टोला
पुढे बोलताना, त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनाही टोला लगावला. देशाचा विकास करण्यासाठी योग्य त्या कार्यक्रमांची आणि धोरणांची आवश्यकता असते. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे कठोर परिश्रम करावे लागतात, असे ते म्हणाले. S Jaishankar
S Jaishankar heard to Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- “हिंदुत्व” सोडले म्हणून ठाकरेंना शिंदेंनी ठोकले; पण शिंदे सेनेचे “हिंदुत्व” बुरखे वाटपावर आले!!
- Lucknow : यूपीत धर्मांतर करणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप; 4 जणांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा; 1000 लोकांचे धर्मांतर
- Devendra Fadnavis : काँग्रेसी पंतप्रधानांच्या इफ्तार पाट्या जोरात; पण मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला गेले, तर मोठा गहजब!!
- Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाच्या जामीन याचिकेवर कर्नाटक हायकोर्टात सुनावणी; कोर्टाने म्हटले- सुनावणी खुल्या न्यायालयात होऊ शकत नाही