वृत्तसंस्था
कीव: रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक करत असल्याची माहिती समोर आली आहे. Russia’s bombing of Ukraine’s nuclear power plant sparks outrage in Europe
हा युक्रेनचा सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे, येथे ६ अणुभट्ट्या आहेत. रशियन सैन्याची या शहराकडे वाटचाल सुरू होती. आता इथे जबरदस्त बॉम्बहल्ले सुरु आहेत. या हल्ल्यामुळे धोकादायक अपघाताचा इशारा देण्यात आला आहे. युक्रेनचे म्हणणं आहे की, प्लांटमधून धूर निघताना दिसत आहे.
रशियानं युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन अधिकार्यांचा दावा आहे की हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत आहेत.
Russia’s bombing of Ukraine’s nuclear power plant sparks outrage in Europe
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युध्द थांबविल्याच्या वृत्ताचे परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन
- गेल्या सत्तर वर्षांत वैद्यकीय सेवा मजबूत झाली असती तर तुम्हाला युक्रेनला शिकण्यासाठी जावेच लागले नसते, पंतप्रधानांनी साधला युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद
- यू ट्यूबवरून भारतीयांना कमाविले ६८०० कोटी रुपये, पाच वर्षांत युट्यूबमुळे मिळाल्या पावणेसात लाख नोकऱ्या
- फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी