• Download App
    आनंदाची बातमी : भारतात लवकरच येणार रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन, रशियन राजदूतांची माहिती । Russian Single Dose Vaccine Sputnik V Light Will Be In India Soon Says Russian Diplomat

    आनंदाची बातमी : भारतात लवकरच येणार रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन, रशियन राजदूतांची माहिती

    Russian Single Dose Vaccine : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतात सध्या सीरम संस्थेची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन दिली जात आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. रशियाचे राजदूत म्हणाले की, रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन स्पुतनिक लाईट लवकरच भारतात दाखल होईल. Russian Single Dose Vaccine Sputnik V Light Will Be In India Soon Says Russian Diplomat


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतात सध्या सीरम संस्थेची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन दिली जात आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसीची दुसरी खेपही भारतात दाखल झाली आहे. रशियाचे राजदूत म्हणाले की, रशियाची सिंगल डोस व्हॅक्सिन स्पुतनिक लाईट लवकरच भारतात दाखल होईल.

    भारतातील रशियन राजदूत एन. कुडाशेव यांनी वृत्तसंस्था एएनआयला म्हटले की, स्पुतनिक व्ही एक रशियन-भारतीय लस आहे. आम्हाला आशा आहे की, भारतात त्याचे उत्पादन हळूहळू दरवर्षी 85 कोटी डोसपर्यंत वाढले जाईल. स्पुतनिकची सिंगल डोस लस लवकरच भारताला देण्याची योजना आहे. एन. कुडाशेव म्हणाले की, स्पुतनिक व्हीचा प्रभावीपणा जगात सर्वज्ञात आहे. 2020च्या उत्तरार्धात रशियामध्ये सुरू झालेल्या लोकांच्या लसीकरणात याचा यशस्वीरीत्या उपयोग करण्यात आला आहे. ते म्हणाले की, रशियन तज्ज्ञांनी जाहीर केले आहे की, ही लस कोरोनाच्या नव्या प्रकारांवरही प्रभावी आहे.

    स्पुतनिक लाइट लस काय आहे?

    कोरोनाविरुद्ध रशियाने सिंगल डोस लसीची निर्मिती केली आहे. हीच लस स्पुतनिक व्ही लाइट या नावाने ओळखली जाते. कोरोनाविरुद्ध ही सिंगल डोस लस 80% प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचा असा दावा आहे की, लाइट व्हर्जन लस ही दोन डोसवाल्या लसींपेक्षा एकाच डोसमध्ये प्रभावी ठरते. स्पुतनिकच्या या लाइट आवृत्तीच्या वापरालाही रशियन सरकारने मान्यता दिली आहे.

    स्पुतनिकवर प्रश्न उपस्थित

    सुरुवातीला स्पुतनिकच्या क्षमतेवर शंका घेण्यात आली, परंतु नंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा ‘द लान्सेट’मध्ये या लसीच्या चाचणीचा डेटा प्रसिद्ध झाला तेव्हा लस सुरक्षित आणि प्रभावी म्हणून वर्णन करण्यात आले. खरंतर, कोरोनाविरुद्ध रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत ती 91.6 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. ‘द लान्सेट’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या डेटाच्या अंतरिम विश्लेषणामध्ये हा दावा केला गेला आहे. अभ्यासाचे हे निकाल सुमारे 20,000 सहभागींकडून गोळा केलेल्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहेत.

    भारतात आपत्कालीन वापरास मान्यता

    एप्रिलमध्ये, रशियन कोरोना या लसीच्या ‘स्पुतनिक व्ही’च्या आपत्कालीन वापरास भारतात मान्यता देण्यात आली. सेंट्रल मेडिसिन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीने देशातील काही अटींसह रशियन कोरोना लस ‘स्पुतनिक व्ही’च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती, याला भारतीय औषध नियंत्रक (डीसीजीआय) ने मान्यता दिली. गमालया संस्थेने असा दावा केला आहे की, कोरोनाविरुद्ध आतापर्यंत विकसित केलेल्या सर्व लसींमध्ये स्पुतनिक-व्ही सर्वात प्रभावी आहे.

    Russian Single Dose Vaccine Sputnik V Light Will Be In India Soon Says Russian Diplomat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार