• Download App
    पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार Russian President Vladimir Putin to participate at the United Nations Security Council meeting on maritime security on Monday.

    पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे अस्थाई अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सुरक्षा समितीमध्ये “सागरी सुरक्षेतील वाढीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य” या महत्त्वाच्या विषयावर खुली चर्चा अर्थात open debate होणार आहे. या चर्चेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन, व्हिएटनामचे पंतप्रधान, नायजर, केनिया, कांगो या देशांचे राष्ट्रप्रमुख देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या open debate चे व्यूहरचनात्मक महत्त्व वाढले आहे. Russian President Vladimir Putin to participate at the United Nations Security Council meeting on maritime security on Monday.

    भारताने संयुक्त राष्ट्रसंघाचा सुरक्षा समितीचा अध्यक्ष या नात्याने या खुल्या चर्चेस आधिमान्यता दिली आहे. याचा नेमका अर्थ काय…?? सध्या सागरी सुरक्षेसंदर्भात कोणता विभाग धोकादायक मानला जातो…?? या विषयांवर भारतासह सुरक्षा समितीतील कोणत्या देशांना चर्चा करण्यात रस आहे…?? हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत.

    यात रशियाचे अध्यक्ष पुतीन सहभागी होणार असल्याने चर्चेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कारण रशिया आणि चीन हे दोन्ही देश सुरक्षा समितीचे कायमचे सदस्य आहेत. त्यांच्यात सीमावाद आहे, तसेच पूर्वोत्तर समुद्रात दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर अनेकदा हे दोन्ही देश एकमेकांशी अमेरिकेविरोधात सहकार्य करताना दिसतात. चीन भारताचा मोठा स्पर्धक आहे. पण रशिया भारताचा मित्र आहे. सुरक्षा समितीत अनेकदा रशियाने “व्हेटो पॉवर” वापरून भारताची पाठराखण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर व्लादिमिर पुतीन यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा open debate मधल्या सहभागाला विशेष महत्त्व आहे.

    अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांच्या सहभागालाही विशेष महत्त्व आहे. भारत आणि अमेरिका QUAD गटाचे प्रमुख सदस्य आहेत. ही प्रामुख्याने हिंद – प्रशांत महासागराशी Indo Pacific संबंधित संघटना आहे. त्यामुळे अमेरिकेचा open debate मधला सहभाग देखील महत्त्वाचा आहे.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामी दहशतवाद हा सर्व देशांचा चिंतेचा विषय आहे. त्याच बरोबर युरोप, अमेरिका आणि आशिया या खंडातील देशांचा एक गट या विरोधात ठामपणे कारवाई करण्यात आघाडीवर आहे. तसेच हिंदी आणि प्रशांत महासागरात अर्थात
    Indo – Pacific, South China Sea
    येथे सागरी सुरक्षेला चीनकडून वाढता धोका उत्पन्न होतो आहे. भारतासह आग्नेय आशियातील इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया, सिंगापूर, व्हिएटनाम यांच्यासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशांच्या सागरी सीमांपर्यंत हा धोका पोहोचला आहे.

    या महत्त्वाच्या विषयावर भारताच्या अध्यक्षतेखाली खुली चर्चा अर्थात open debate होणार आहे. चीन सुरक्षा समितीचा कायमचा सदस्य आहे. त्यामुळे चीनचे प्रतिनिधीही या खुल्या चर्चेत सहभागी होणार आहेतच. सुरक्षा समितीचे १५ सदस्य देश आपापली मते या खुल्या चर्चेत स्पष्टपणे मांडणे अपेक्षित आहे. अध्यक्ष या नात्याने भारत या चर्चेचे सूत्रसंचालन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्त्वाच्या चर्चेचे सूत्रसंचालक असणार आहेत. ते भारतीय सुरक्षेसंबंधी मत मांडतील.

    चीनकडून लडाखमध्ये आणि त्याच वेळी सागरी सीमेवरही सुरक्षेसाठी भारताला धोका उत्पन्न होत असताना भारताच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवर अशाप्रकारे सागरी सुरक्षेसंबधी एकजुटीने आवाज उठणे आणि सहकार्य वाढणे याला भारताच्या दृष्टीने व्यूहरचनात्मक महत्त्व आहे.

    Russian President Vladimir Putin to participate at the United Nations Security Council meeting on maritime security on Monday.

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य