• Download App
    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी केली फोनवर चर्चा Russian President Putin had a phone conversation with Prime Minister Modi

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी केली फोनवर चर्चा!

    युक्रेन युद्धासह अनेक मुद्य्यांवर झाली चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. Russian President Putin had a phone conversation with Prime Minister Modi

    यावेळी पीएम मोदींनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रशियाच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. या संवादादरम्यान पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना सद्यस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की युक्रेन कोणत्याही प्रकारच्या करारासाठी राजकीय आणि राजनैतिक पावले उचलण्यास नकार देत आहे.

    याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणून कौतुक केले होते. रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारताचे उदाहरण दिले. पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचे कौतुक केले आणि भारताला त्याचे सकारात्मक परिणाम मिळाल्याचे सांगितले. यादरम्यान पुतिन म्हणाले होते की, युक्रेन युद्धानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा रशियन बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही.

    पुतिन म्हणाले होते की, आमचे मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना सुरू केली. याचे सकारात्मक परिणाम भारताला मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर ‘स्पष्ट परिणाम’ झाला आहे.

    Russian President Putin had a phone conversation with Prime Minister Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न