विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फोन केला. भारताने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात रशियाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. पण त्यापलीकडे जाऊन पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातले balancing act केले.Russian President Putin calls Prime Minister Modi
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने भारताला आधीच पाठिंबा दिला होता. पण आज अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून दहशतवादाविरुद्ध लढ्यामध्ये रशिया भारताच्या पाठीशी असल्याची खात्री दिली. पहलगाम मधल्या हल्ल्याचा कट रचून तो अंमलात आणणाऱ्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे, या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी x हँडलवर दोन्ही नेत्यांच्या चर्चेची माहिती दिली.
‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’
वास्तविक पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना यापूर्वीच रशियाच्या व्हिक्टरी डे परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. परंतु, त्यांच्या ऐवजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे जाणार आहेत.
मात्र या व्हिक्टरी डे परेडला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित राहणार असून ते 7 ते 10 मे असा 4 दिवसांचा रशिया दौरा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोप युक्रेनच्या बाजूने उभे राहिले असताना चीनने रशियाला पाठिंबा दिला. त्यामुळे शी जिनपिंग यांचा रशिया दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे, पण त्याचबरोबर पहलगाम हल्ल्यामध्ये चिनी गुप्तहेर संस्थेचा हस्तक्षेप देखील संशयाच्या घेऱ्यात आहे. त्यामुळे एकीकडे चिनी राष्ट्राध्यक्षांचे रशियात स्वागत करण्यापूर्वी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून रशिया भारताच्या पाठीशी उभा असण्याची खात्री दिली, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने balancing act ठरले. मात्र, याविषयी भारताच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही.
Russian President Putin calls Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?
- Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाणे
- Rajnath Singh संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला इशारा, म्हणाले…
- Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू