• Download App
    युक्रेनचा शेजारी पोलंड देशाच्या दौऱ्यावर जाणार; अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची घोषणा । Russia - Ukraine War: Joe Biden Takes Big Risk! will visit Ukraine's neighboring Poland on 25 march

    युक्रेनचा शेजारी पोलंड देशाच्या दौऱ्यावर जाणार; अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची घोषणा

    वृत्तसंस्था

    वारसॉ : रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी युक्रेनचा शेजारी देश पोलंड दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. Russia – Ukraine War: Joe Biden Takes Big Risk! will visit Ukraine’s neighboring Poland on 25 march

    या युद्धामुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध थांबविण्यासाठी पोलंडला रवाना होत आहेत.  रशियाने युक्रेनवर भीषण हल्ले सुरुच ठेवले आहेत. यामुळे लाखो युक्रेनी नागरिकांनी युद्धभूमी सोडली असून त्यांनी शेजारच्या देशांमध्ये आसरा घेतला आहे.



    कीव्ह अमेरिका आणि नाटोचे देश शस्त्रास्त्रे पुरवत असल्याने पडत नाही. याचा रशियाला प्रचंड राग असून दोन दिवसांत युक्रेन पाडण्याचे मनसुबे रचणारे पुतीन पुरते घायाळ झाले आहेत. आता युद्ध अशा वळणावर येवून ठेपले आहे की, ते थांबविताही येणार नाही आणि न थांबल्यास तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

    अशातच युक्रेनच्या मदतीसाठी तप्तर असलेल्या पोलंडमध्ये जाण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला आहे. येत्या २५ मार्चला बायडेन पोलंडची राजधानी वारसॉला जाणार आहेत. युद्धाने धगधगती युक्रेनची सीमा तेथून जवळ आहे. रशियाची सीमा जरी पोलंडला लागून नसली तरी रशियाचा मित्र बेलारुसची सीमा पोलंडला लागून आहे. येथे बायडेन पोलंडचे अध्यक्ष आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

    Russia – Ukraine War : Joe Biden Takes Big Risk! will visit Ukraine’s neighboring Poland on 25 march

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे