• Download App
    Russia Ukraine War : 9000 भारतीयांना युक्रेनच्या बाहेर काढण्यात यश; बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घ्या; जनरल व्ही. के. सिंग यांचे ट्विट |Russia Ukraine War: 9000 Indians evacuated from Ukraine; Take refuge in a bomb shelter; General V. K. Singh's tweet

    Russia Ukraine War : 9000 भारतीयांना युक्रेनच्या बाहेर काढण्यात यश; बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घ्या; जनरल व्ही. के. सिंग यांचे ट्विट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खार्कीव मध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या बातमीनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली असून रशिया विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.Russia Ukraine War: 9000 Indians evacuated from Ukraine; Take refuge in a bomb shelter; General V. K. Singh’s tweet

    या पार्श्वभूमीवर युक्रेन मधून गेल्या 15 दिवसांपासून ते आज पर्यंत 9000 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी काही हजार भारतीय युक्रेनमधील विविध शहरांमध्ये अडकले आहेत. या सर्वांना यूक्रेन बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीय हवाई दलाची देखील मदत घेण्यात आली आहे. यूक्रेन बाहेर पडेपर्यंत सर्व भारतीयांनी बाँब शेल्टरमध्ये आणि अन्य सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन करणारे ट्विट केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी केले आहे.



    कर्नाटकच्या नवीन शेखरप्पाचा विद्यार्थ्याचा मृत्यू

    कीव्ह : रशिया – युक्रेनमधील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हावेरी जिल्ह्यातील चलागेरी येथील नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. खार्किवच्या प्रशासनाने यापूर्वीच अशी माहिती दिली होती की, रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

    युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना बुकारेस्टवरुन घेऊन येणारे सातवे विशेष विमान आज, मंगळवारी सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

    ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी

    मुंबई विमानतळावर आज सकाळी 7 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल रात्री 11.10 वाजता मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते.

    एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे.

    Russia Ukraine War: 9000 Indians evacuated from Ukraine; Take refuge in a bomb shelter; General V. K. Singh’s tweet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र