• Download App
    Russia Ukraine रशियाशी व्यापार थांबवा अन्यथा निर्बंधांना सामोरे जा, अमेरिका प्रणित NATO ची भारत, चीन आणि ब्राझीलला दमबाजी; पण परिणाम शून्य!!

    रशियाशी व्यापार थांबवा अन्यथा निर्बंधांना सामोरे जा, अमेरिका प्रणित NATO ची भारत, चीन आणि ब्राझीलला दमबाजी; पण परिणाम शून्य!!

    नाशिक : रशिया युक्रेनशी युद्ध थांबायला तयार नाही. त्यामुळे तुम्ही रशियावर युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणा. त्याला युद्धविराम चर्चेला सुरुवात करायला भाग पाडा अन्यथा रशियाशी व्यापार थांबवा नाहीतर आम्ही तुमच्यावर निर्बंध लादू अशा शब्दांमध्ये अमेरिका प्रणित नार्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच NATO ने भारत, चीन आणि ब्राझीलला दमबाजी केली. Russia Ukraine peace deal

    भारत रशियाकडून सध्या सर्वाधिक तेल घेतो. चीनही रशियाशी व्यापार थांबवायला तयार नाही. ब्राझीलचा रशियाशी व्यापार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाटो संघटनेने रशियाच्या नाकात वेसण घालण्यासाठी भारत, चीन आणि ब्राझीलला दमबाजी करून पाहिली. तुम्ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन कॉल करा. त्यांना युद्धविराम चर्चेसाठी प्रवृत्त करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर मोठे निर्बंध लादू, अशी दमबाजी नाटोचे जनरल सेक्रेटरी जो रूट यांनी केली.

    युक्रेनला आर्थिक मदत करण्यासाठी युरोप निधी उभारतो आहे. या निधीच्या पैशातूनच अमेरिका युक्रेनला प्रचंड शस्त्र पुरवठा करणार आहे. त्याची आर्थिक किंमत युरोप चुकवेल. पण मूळातच रशियाला युद्धविराम चर्चेला आणण्यासाठी भारत, चीन आणि ब्राझील यांनी दबाव आणावा. या तीनही देशांनी रशियाशी व्यापार थांबवावा. प्रामुख्याने ते खरेदी थांबवावी, अन्यथा नाटोच्या निर्बंधांना सामोरे जावे, अशी भाषा जो रूट यांनी वापरली.

    – चीन आणि भारत नाटोला भारी

    प्रत्यक्षात भारत आणि चीन अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या या दृष्टीने सगळ्या युरोपला भारी आहेत. अमेरिका या दोन्ही देशांशी स्वतंत्रपणे व्यापार करायच्या बेतात आली आहे. या दोन्ही देशांचे युरोपमधल्या तेथील देशांशी स्वतंत्र व्यापार करार आधीच अस्तित्वात आहेत. त्यानुसारच त्यांचे आपापसांत व्यापार सुरू आहेत‌‌. अशा स्थितीत नाटोची फुकटची दमबाजी भारत आणि चीन ऐकण्याची सुतराम शक्यता नाही. नाटो एकेकाळी फार बळकट लष्करी संघटना होती. नाटोचे लष्करी बळ एकीकडे आणि सगळे जग दुसरीकडे अशी अवस्था होती, पण आता चीन आणि भारत हे लष्करी दृष्ट्या एवढे प्रबळ बनलेत की नाटो या दोन बळकट देशांवर कुठले निर्बंध लादेल आणि हे दोन देश झुकतील, याची जराही शक्यता नाही.

    – जयशंकर यांचे युरोपला खडे बोल

    नाटो संघटनेने भारत चीन आणि ब्राझीलला दमबाजी केली असली, तरी तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युरोपमध्ये जाऊनच युरोपियन युनियनला खडे बोल सुनावले होते. संपूर्ण युरोप एक दुपारभर जेवढे तेल वापरतो, तेवढे तेल भारत काही महिन्यांसाठी वापरतो. ज्या देशातून तेल स्वस्त मिळेल तिथून भारत तेल घेतो. त्यामुळे भारताने कुठून तेल खरेदी करावे हे सांगण्याच्या फंदात युरोपने पडू नये. युरोपातले देश रशियातून तेल खरेदी करतात आणि भारताला नस्ता उपदेश करत बसतात, तसला उपदेश भारत ऐकण्याची शक्यता नाही, असे जयशंकर जाहीर मुलाखतीत म्हणाले होते.

    जयशंकर यांच्या या वक्तव्यातून युरोपियन युनियन आणि नाटो संघटना यांनी धडा शिकायला हवा होता. पण पण दोन्ही संघटना तो शिकल्या नाहीत म्हणून नाटोचे जनरल सेक्रेटरी जो रूट यांना फुकटची दमबाजी करायचे सुचले. त्या पलीकडे नाटोच्या दमबाजीला कुठलाही अर्थ नाही. मोठा परिणाम होण्याची तर अजिबात शक्यता नाही.

    Russia Ukraine peace deal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Trump White House : ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना सुरक्षेत त्रुटी, लॉकडाऊन लागू; अज्ञाताने सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला