वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राशी अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी आज टेलीफोन वरून 35 मिनिटे बातचीत केली. केंद्र सरकारच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. Russia Ukraine conflict: Prime Minister Modi talks with Ukrainian President Zhelensky for 35 minutes !!
युक्रेन मधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी झेलेन्स्की यांच्या सरकारने जी मदत केली त्या मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात द्विपक्षीय बातचीत होणार आहे. त्याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मित्र वलादिमिर पुतीन यांना सांगून युद्ध थांबवावे, असे आवाहन युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतेच केले होते.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनच्या अध्यक्षांशी बातचीत केली आहे. यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी देखील फोनवरून बातचीत करणार असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Russia Ukraine conflict: Prime Minister Modi talks with Ukrainian President Zhelensky for 35 minutes !!
महत्त्वाच्या बातम्या
- नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक
- U. P. Elections : उत्तर प्रदेशात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी, बसप नेत्यांचे विजय – पराजयाचे “राणा भीमदेवी दावे”!!
- युक्रेन परराष्ट्रमंत्र्यांनी शेअर केला रशियाच्या बॉम्बचा फोटो; नो-फ्लाय झोन घोषित करण्याचे आवाहन
- पवार म्हणाले, आम्ही काय “त्यांना” पुन्हा येऊ देतो…!!; पडळकर म्हणाले, वैराग्याच्या वयातही बगल मे छूरीच…!!