रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर हल्ला करू नये, असे आवाहन केले आहे. रशिया-युक्रेन संकटावर तीन दिवसांत सुरक्षा परिषदेच्या दुसऱ्या तातडीच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखले पाहिजे, असे गुटेरेस यांनी सांगितले. ते म्हणाले की जगात शांतता आवश्यक आहे कारण यापूर्वीही अनेक लोक मारले गेले आहेत. Russia military action in Ukraine, UN Secretary General Antonio Guterres appeals to Putin – stop your troops from attacking!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर हल्ला करू नये, असे आवाहन केले आहे. रशिया-युक्रेन संकटावर तीन दिवसांत सुरक्षा परिषदेच्या दुसऱ्या तातडीच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखले पाहिजे, असे गुटेरेस यांनी सांगितले. ते म्हणाले की जगात शांतता आवश्यक आहे कारण यापूर्वीही अनेक लोक मारले गेले आहेत.
तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला होता की, अलिकडच्या दिवसांत जग अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. डोनेस्तक आणि लुगांस्क हे युक्रेनचे स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता देऊन संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचा इशारा त्यांनी रशियाला दिला. युक्रेन संकटाबाबत आमसभेच्या बैठकीत ताज्या घडामोडींवर गंभीर चिंता व्यक्त करत अँटोनियो गुटेरेस यांनी व्लादिमीर पुतीन यांना शांतता राखण्यास सांगितले. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनीही रशियाच्या अध्यक्षांना युक्रेनवर हल्ला करू नये आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.
पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच युक्रेनच्या सैन्याला शस्त्रे ठेवण्याचे आवाहन केले. जरी व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की रशियाची युक्रेनला जोडण्याची कोणतीही योजना नाही, परंतु रशिया कोणत्याही बाह्य धोक्याला त्वरित प्रतिसाद देईल. संकटाच्या दरम्यान, युक्रेनने बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली. युक्रेन संकटाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) तातडीचे सत्र सध्या सुरू आहे.
Russia military action in Ukraine, UN Secretary General Antonio Guterres appeals to Putin – stop your troops from attacking!
महत्त्वाच्या बातम्या
- Crude Price Hike : भारतासाठी वाईट बातमी, रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरच्या विक्रमी पातळीवर
- Watch Russia Ukraine War : रशियन रणगाडे युक्रेनमध्ये शिरले, राजधानी कीवसह अनेक शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, पुतिन यांनी दिली धमकी
- Russia – Ukraine war : युक्रेनच्या 13 शहरांवर रशियाचा हल्ला; प्रतिकाराची युक्रेनची तयारी!!; भारताचे संयमाचे आवाहन
- स्वाभिमानाचे वीज मागणीचे आंदोलन पेटले; शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय