• Download App
    युक्रेनची राजधानी घेण्यासाठी रशियाचे हल्ले तीव्र |Russia intensifies attacks on Ukraine

    युक्रेनची राजधानी घेण्यासाठी रशियाचे हल्ले तीव्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियाने हल्ले तीव्र केले आहेत. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे, रशियाच्या सेंट्रल बँकेवर अमेरिका, युरोपियन युनियन आणि ब्रिटनने बंदी घातली आहे. जर्मनीने आपली हवाई हद्द रशियन विमानांसाठी बंद केली आहे. Russia intensifies attacks on Ukraine

    सोमवारी रशियन चलन बाजारात मोठी घसरण होऊ शकते. युक्रेनमध्ये युद्ध पुकारलेल्या रशियाला अनेक आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत रशियन चलन बाजारात मोठी घसरण होण्याची भीती रशियन सेंट्रल बँकेच्या एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.



    तेल डेपोवर क्षेपणास्त्र हल्ला

    रशिया चांगलाच आक्रमक झाला आहे. युक्रेनमधील खार्किवमध्ये त्याने गॅस पाइपलाइन उडवली. त्याचवेळी वासिलकिव्ह शहरातील एका तेल डेपोलाही रशियन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे.

    खार्किवमध्ये किरणोत्सर्गी कचऱ्याची विल्हेवाट लावणार्‍या गॅस पाईपलाईनवर हवाई हल्ला झाला आहे. कीव काबीज करण्यासाठी रशियाने चौफेर हल्ले केले आहेत. रात्री नऊ वाजल्यापासून येथे दोन स्फोट झाले आहेत. दरम्यान, रशियाने कीवजवळील रेडिओअॅक्टिव्ह वेस्ट डिस्पोजल साइटवर हवाई हल्ला केल्याची बातमी आहे. मात्र, आतापर्यंत येथून गळती झाल्याचे वृत्त नाही.

    Russia intensifies attacks on Ukraine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!