• Download App
    रशियातले बंड 12 तासांत थंड; पण बंडाची ठिणगी विझणार नसल्याचा युरोपियन माध्यमांचा दावा Russia drops charges against Wagner chief Prigozhin after his forces halt march to Moscow

    रशियातले बंड 12 तासांत थंड; पण बंडाची ठिणगी विझणार नसल्याचा युरोपियन माध्यमांचा दावा

    वृत्तसंस्था

    मॉस्को :  रशियातले बंड, 12 तासांत थंड!!अशी अवस्था आज पहाटे झाली रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी बंडखोरांना स्पष्ट इशारा दिल्यानंतर तसेच बेलारूसच्या अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर रशियातील खाजगी सैन्य वॅगनार ग्रुपचे प्रमुख येवगिनी प्रिगोझिन बेलारूसला जाणार आहेत. त्यांनी आपल्या सैन्याला युक्रेन मधल्या बराकीत परत जाण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निमित्ताने रशियात पडलेली बंडाची ठिणगी इतक्या लवकर विझणार नाही, असा दावा युरोपीय वृत्तपत्रांनी केला आहे. Russia drops charges against Wagner chief Prigozhin after his forces halt march to Moscow

    रशियात खासगी सैन्य वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याने बंडखोरीची घोषणा केली होती. यामुळे रशियात गृहयुद्धाची आणि सत्ताबदलाची स्थिती निर्माण झाली होती.

    त्यामुळे वेळीच सावध होत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी वेगवान हालचाली करून रशियात निर्माण होत असलेल्या अराजकतेवर नियंत्रण मिळवले. पण आता रशियन सरकार आणि प्रिगोझिन यांच्यात बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केली. अलेक्झांडर लुकाशंको यांच्याद्वारे करण्यात आलेल्या करारानुसार आता प्रिगोझिन रशिया सोडून बेलारूसला जातील.


    रशियाकडून पाकिस्तानला स्वस्तात मिळाले कच्चे तेल, पण ते भारतातच रिफाइन करण्याची अट


    अल जजिराने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सांगितलं की, लुकाशेंकोने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या परवानगीने मध्यस्थीसाठी हालचाली केल्या होत्या. लुकाशेंको आणि प्रिगोझिन हे 20 वर्षांपासून एकमेकांना वैयक्तिक ओळखतात. प्रिगोझिन यांनी म्हटलं की, आमच्या सैन्याला आदेश दिला आहे की, रक्तपात होऊ नये त्यामुळे मॉस्कोच्या दिशेने जाण्याऐवजी आपआपल्या ठिकाणी परत या.

    न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, येवगीने प्रिगोझिन यांनी बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आपल्या लष्कराला थांबवण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात रशियाने वॅगनर नेत्याविरोधात लावलेले देशद्रोहाचे सर्व आरोप मागे घेतले.

    दिमित्री पेसकोव्ह म्हणाले की, प्रिगोझिन बेलारुसला जाणार आहेत. त्यांच्यासोबत विद्रोह करणाऱ्या लष्करावरही कोणताच खटला चालवला जाणार नाही. बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, प्रिगोझिन यांच्यासोबत तणाव कमी करण्याच्या करारावर चर्चा सुरू आहे. बेलारूसच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, आज रात्री ९ वाजता राष्ट्रपतींनी फोनवरून चर्चा केली. बेलारूसच्या राष्ट्रपती लुकाशेंको यांनी वॅगनर प्रमुखाशी बोलणं झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले. याबद्दल पुतीन यांनी लुकाशेंको यांचे आभारही मानले.

    मात्र या बंडाच्या निमित्ताने रशियात पडलेली ठिणगी इतक्या लवकर विझणार नाही, असा दावा ब्रिटन मधील द टेलिग्राफने केला आहे. वॅगनर ग्रुपने रशियातल्या बाकीच्या सैन्याला “स्वतंत्र मार्ग” दाखवून दिला आहे आणि ते बराकीत परत जात आहेत, हे नीट लक्षात घेतले पाहिजे, असे द टेलिग्राफने म्हटले आहे.

    Russia drops charges against Wagner chief Prigozhin after his forces halt march to Moscow

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!