विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीतून चाललीये पळापळ आणि काँग्रेस होतेय दिवसेंदिवस हतबल!!, अशी अवस्था आजही कायम आहे कारण INDI आघाडीतून बाहेर पडत फारूक अब्दुल्लांनी काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. Running away from INDI alliance, Congress is getting desperate
फारुख अब्दुल्ला आत्तापर्यंत INDI आघाडीच्या प्रत्येक बैठकीत सामील झाले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. तिथे अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सची मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीशी आघाडी आहे. काँग्रेसला तिथे काही स्थान उरलेले नाही. पण तरी देखील फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला हे दोघेही INDI आघाडीच्या बैठकांमध्ये सामील होत होते. पण आजच अब्दुल्लांनी आपला मार्ग वेगळा असल्याचे काँग्रेसला सांगून टाकले.
यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे स्वतःहूनच INDI आघाडीतून बाहेर पडलेच आहेत. त्यांच्या पाठोपाठ फारूक अब्दुल्ला यांनी देखील स्वतंत्र मार्ग चोखाळला आहे.
मनी लॉन्ड्रीग प्रकरणात फारूक अब्दुल्लांना ईडी चौकशीचे समन्स आले म्हणून फारूक अब्दुल्लांनी INDI आघाडीतून एक्झिट घेतली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे पण तशी कोणतीही चर्चा असली तरी प्रत्यक्षात अब्दुल्ला INDI आघाडी पासून वेगळे झाले याची वस्तुस्थिती आहे.
फारूक अब्दुल्ला आजही INDI आघाडीचे घटकच आहेत. आमची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. पण प्रत्येक राजकीय पक्षाची काही मजबुरी असते. तसे फारूक अब्दुल्लांचे बाबतीत घडले असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.