• Download App
    गांधी कुटुंबिय राजीनामा देणार असल्याची अफवा की पुन्हा एकदा खुंटा बळकट करून घेण्याचा डाव|Rumors that the Gandhi family will resign are a ploy to strengthen the peg once again

    गांधी कुटुंबिय राजीनामा देणार असल्याची अफवा की पुन्हा एकदा खुंटा बळकट करून घेण्याचा डाव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांत दारुण पराभव झाल्यावर कॉँग्रेसमध्ये आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यातच गांधी कुटुंबिय राजीनामा देणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र, ही खरोखरच अफवा आहे की गांधी कुटुंबियांनी आपला खुंटा अधिक बळकट करण्याचा डाव असा सवाल होत आहे.Rumors that the Gandhi family will resign are a ploy to strengthen the peg once again

    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. अनेकांनी तर काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नामुष्कीजनक पराभवावर रविवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात पाच राज्यांमधल्या निकालंवर चर्चा केली जाणार आहे.



    दुसरीकडे जी-२३ गटानं देखील पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाºया कोअर कमिटीच्या बैठकीत गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात आता थेट काँग्रेस पक्षाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

    पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर यावर जोरदार चर्चा सुरू झाली. हा सगळा प्रकार व्हायरल झाल्यानंतर खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.

    रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात खुलासा केला आहे. वृत्तवाहिनीवर काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. सत्ताधारी भाजपामुळे व्हायरल करण्यात आलेल्या चर्चेवर विसंबून हे वृत्त दाखवण्यात आलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

    Rumors that the Gandhi family will resign are a ploy to strengthen the peg once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी