वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानात गोपलानासाठी नवे नियम जाहीर करून सरकारने अडचणी तयार केल्या आहेत. त्यात एका कुटुंबाला एक गाय किंवा म्हैस पाळता येणार आहे. पण त्यासाठी एक हजार रुपयाचे लायसेन्स काढण्याची सक्ती केली आहे. Rules for city rearing in Rajasthan; Permission allowed only one cow or buffalo in the nest; Forced removal of license
ही नियमावली सरकारने २१३ शहरात लागू केली आहे. हे नवे नियम जाचक असल्याचे गोपालन करणाऱ्यांनी सांगितले. याशिवाय नियमानुसार घरात १०० चौरस फूट अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. तेथे जनावरांना ठेवण्याची व्यवस्था करावी. लायसेन्सआठी वर्षाला सरकारला हजार रुपये द्यावे लागतील. जनावरे रस्त्यावर भटकताना दिसली तर १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. प्रत्येक गाईसाठी बिल्ला आवश्यक असून त्यावर सर्व तपशील लिहिलेला असावा. शेण साठवून ठेऊ नये त्याची विल्हेवाट शहराबाहेर करावी. शहरात रस्त्यावर चारा विकण्यास बंदी घातली आहे. जो कोणी विकला त्याला ५०० रुपयाचा दंड केला जाईल. विशेष म्हणजे दूध शहरात विकता येणार नाही. या नवीन नियमावली मुळे गोपालन करणे अवघड झाले आहे.
Rules for city rearing in Rajasthan; Permission allowed only one cow or buffalo in the nest; Forced removal of license
महत्त्वाच्या बातम्या
- गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
- भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर
- दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप
- अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो