विशेष प्रतिनिधी
मुंबई : वारंवार प्रवास कराव्या लागणाऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन पंधरा दिवसांचा अवधी उलटला असल्यास राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची गरज नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या कोविन या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेत. RTPCR is not required if both doses of the vaccine have been taken for admission to the state
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे. इतर सर्व नागरीकांसाठी आरटीपीसीआर चाचणीच्या वैधतेचा काळ 48 तासांवरून वाढवून 72 तास इतका करण्यात आल्याचे एका पत्रका मार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
RTPCR is not required if both doses of the vaccine have been taken for admission to the state
महत्त्वाच्या बातम्या
- ITI साठी प्रवेशप्रक्रिया सुरू : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध, नवाब मलिक यांची माहिती
- West Bengal Violence : NHRC ने रिपोर्टमध्ये म्हटले- रेप आणि हत्येच्या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी, राज्याच्या बाहेर चालावेत खटले
- GST Compensation : जीएसटी नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी रुपये वितरीत, महाराष्ट्राला 6501.11 कोटी
- मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतानच्या नावामुळे वादाची ठिणगी, सपा नगरसेविकेविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा
- सैन्याला भाजीपाला पुरवणाराच निघाला ISI चा हेर, चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता