• Download App
    RSS बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी संघ ठामपणे उभा; बंगलोरच्या प्रतिनिधी सभेत ठराव मंजूर!!

    RSS : बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी संघ ठामपणे उभा; बंगलोरच्या प्रतिनिधी सभेत ठराव मंजूर!!

    विशेष प्रतिनिधी

    बंगलोर : बांगलादेशातल्या हिंदू समाजाच्या आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेत आज मंजूर केला. संघाचे सहकार्यवाह अरुण कुमार त्यांनी पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली. बांगलादेशातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर तिथल्या हिंदूंवर जे अत्याचार झाले, त्या विरोधात तिथल्या हिंदू समाजाने वैध मार्गाने आंदोलन करून निषेध नोंदवला. त्याची दखल सगळ्या जगाने घेतली ही बाबही अरुण कुमार यांनी अधोरेखित केली. RSS

    अरुण कुमार म्हणाले :

    – भारतीय समाज आणि संघ बांगलादेशातील हिंदू समाजासोबत एकजुटीने उभा आहे. संघाने बांगलादेशातील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.‌ बांगलादेशातील घटनांकडे केवळ राजकीय दृष्टीने किंवा तिथला किरकोळ सत्ता बदल म्हणून पाहिले जाऊ हिंदूंवरच्या अत्याचाराच्या घटना अधिक गंभीर आहेत आणि त्याच्याकडे गांभीर्यानेच पाहिले पाहिजे.

    – बांगलादेशात तिथले बहुसंख्यांक कायम तिथल्या धार्मिक अल्पसंख्यांकांना टार्गेट करतात हा अनुभव जुना आहे. १९५१ मध्ये हिंदू लोकसंख्या २२ % होती आणि आता ती ७.९५ % पर्यंत कमी झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंसाठी हे धार्मिक अस्तित्वाचे संकट आहे. बांगलादेशातील हिंसाचारामध्ये तिथले नवे सरकार आणि त्या सरकारच्या वेगवेगळ्या संस्था यांचा हात आहे. कारण सध्याचे तिथले सरकार बांगलादेशी जनतेला फक्त हिंदूविरोधी नाही, तर भारतविरोधी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब चिंताजनक आहे.

    – बांगलादेशात डीप स्टेट आणि अन्य जागतिक शक्ती आपापल्या पद्धतीने हिंसाचाराची पेरणी करतात याबद्दलही संघाला चिंता वाटते. पण केंद्र सरकारने बांगलादेशी हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासाठी चांगले काम केले याबद्दलही प्रस्तावना आम्ही आवर्जून दखल घेतली. कारण भारत आणि त्यांच्या शेजारच्या देशांमध्ये अविश्वास तयार करायचे काम जरी आंतरराष्ट्रीय शक्ती करत असल्या तरी, भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्रे केवळ राष्ट्रांचा समूह नाहीत; आमचा एक दीर्घ सामायिक इतिहास आहे. आमच्यात बरेच साम्य आहे.

    RSS stands firmly with Bangladeshi Hindus against atrocities

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले