• Download App
    RR Vs DC IPL 2021: रॉयल्स-कॅपिटल्स ची लढत सुरू ; दोन विकेटकीपर-कर्णधार आमनेसामने !RR Vs DC IPL 2021

    RR Vs DC IPL 2021: रॉयल्स-कॅपिटल्स ची लढत सुरू ; दोन विकेटकीपर-कर्णधार आमनेसामने

      राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा सातवा सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे सुरू झाला आहे. 


    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : आयपीएलचा आज ७ वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात होत आहे .हा  सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगतोय . राजस्थानने टॉस जिंकत कर्णधार संजू सॅमसनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.RR Vs DC IPL 2021

    आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल झाले आहेत. कगिसो रबाडाचे (Kagiso Rabada) दिल्ली इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले असून ललित यादवला दिल्लीकडून डेब्यूची संधी मिळाली आहे.

     

    राजस्थानने दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतलेल्या बेन स्टोक्सच्या जागी डेविड मिलरचा (David Miller) समावेश केला आहे श्रेयस गोपालच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश केला आहे. आजच्या सामन्यात दोन विकेटकीपर-कर्णधार आमनेसामने येत आहेत. पंत आणि सॅमसन पहिल्यांदा आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करत आहेत.

    पहा रॉयल्स-कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), डेविड मिलर, मनन वोहरा, जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकारिया.

    दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, टॉम कुरन, कगिसो रबाडा, क्रिस वोक्स आणि आवेश खान.

    राजस्थान रॉयल्स संघाला सलामीला पराभूत झाल्यानंतर आयपीएलमध्ये दुसऱ्या लढतीत आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उतरला आहे.

    RR Vs DC IPL 2021

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!