• Download App
    दिल्लीत दारू घोटाळ्याच्या वरताण वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रीग घोटाळा; आम आदमी पार्टीचा आमदार अमानतुल्ला खानला कोर्टाचे समन्स!!|Rouse Avenue Court issues summons to AAP MLA Amanatullah Khan for non-attendance the notices issued to him in the Delhi Waqf Board Money Laundering case.

    दिल्लीत दारू घोटाळ्याच्या वरताण वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रीग घोटाळा; आम आदमी पार्टीचा आमदार अमानतुल्ला खानला कोर्टाचे समन्स!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांचा व्यक्तिशः सहभाग आहे. त्यांच्या परवानगीने दारू घोटाळ्यात हवाला रॅकेट मार्फत आलेली सगळी रक्कम गोवा निवडणुकीत वापरण्यात आली, असे परखड ताशेरे दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्यावर ओढल्यानंतर आम आदमी पार्टीचा थयथयाट झाला आहे.Rouse Avenue Court issues summons to AAP MLA Amanatullah Khan for non-attendance the notices issued to him in the Delhi Waqf Board Money Laundering case.

    पण दिल्लीतला दारू घोटाळा कमी पडला म्हणून की काय, आता त्यांच्याच सरकारने केलेल्या वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रीग केस मध्ये आम आदमी पार्टीचा आमदार अमानतुल्ला खान याला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने समन्स बजावले आहे.



    राऊज एव्हेन्यू कोर्टाने अमानतुल्ला खान याला समन्स बजावून 20 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कलम 50, पीएमएलए, 2002 चे पालन न केल्याबद्दल पीएमएलए, 2002 च्या कलम 63 (4) सह वाचलेल्या कलम 174 आयपीसी, 1860 अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या अलीकडील तक्रारीची न्यायालयाने दखल घेऊन नवे समन्स जारी केले.

    वक्फ बोर्ड घोटाळा

    दिल्ली वक्फ बोर्ड घोटाळा हा दिल्लीतल्या दारू घोटाळ्यापेक्षा वरताण आहे. 2018 ते 2022 दरम्यानचा हा घोटाळा असून वक्फ बोर्डाची नोकर भरती आणि दिल्लीतील अनेक अवैध नोकर भरती याच्याशी या घोटाळ्याचा संबंध आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीर रीतीने भाडेपट्ट्याने देणे, दुसऱ्याच्या जमिनी लाटून त्या वक्फ बोर्डाच्या नावे करणे आणि नोकर भरतीमध्ये त्या जमिनीच्या संदर्भात गैरव्यवहार करणे यातून हवाला रॅकेट मार्फत शेकडो कोटींचा प्रचंड पैसा गोळा करणे असा हा घोटाळा आहे. या संदर्भात ईडीने केस दाखल केल्यानंतर सुरुवातीला आमदार अमानतुल्ला खान याने ईडीच्या चौकशीला सामोरे जाणे टाळले. त्यामुळे ईडीने राऊज अवेन्यू न्यायालयात धाव घेतली. वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यातील सगळी कागदपत्रे सादर केली. त्यानंतर न्यायालयाने अमानतुल्ला खान याला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली, पण त्याने ती मान्य केली नाही. त्यामुळे आता राऊज अवेन्यू न्यायालयाने त्याला कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

    Rouse Avenue Court issues summons to AAP MLA Amanatullah Khan for non-attendance the notices issued to him in the Delhi Waqf Board Money Laundering case.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’