• Download App
    रोहित वेमुला केसची फाईल तेलंगण काँग्रेस सरकारकडून बंद; रोहित दलित नसल्याचा खुलासा; कुलगुरू + भाजपचे नेते दोषमुक्त!! Rohit Vemula case file closed by Telangana Congress government

    रोहित वेमुला केसची फाईल तेलंगण काँग्रेस सरकारकडून बंद; रोहित दलित नसल्याचा खुलासा; कुलगुरू + भाजपचे नेते दोषमुक्त!!

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : तेलंगणा मधील रोहित वेमुला केसची फाईल काँग्रेस सरकारने बंद केली आहे. रोहित दलित नसल्याचा खुलासा या फाईल मधून तेलंगण पोलिसांनी करत ती फाईल बंद करण्यासाठी तेलंगणा हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर तत्कालीन कुलगुरू आणि भाजपचे नेते यांनाही तेलंगण पोलिसांनी दोषमुक्त ठरविले आहे. Rohit Vemula case file closed by Telangana Congress government

    पीएच डीचा स्टुडन्ट रोहित वेमुला आंबेडकर स्टुडन्ट मोमेंटच्या सदस्य होता. तो दलित विद्यार्थ्यांच्या होस्टेलमध्ये राहत होता. परंतु त्याचे जात सर्टिफिकेट बनावट असल्याचा संशय विद्यापीठ प्रशासनाला आला. त्याने दलित म्हणून सगळ्या सवलती मिळवून विद्यापीठात प्रवेश घेतला होता आपले जात सर्टिफिकेट बनावट ठरले तर आपण विद्यापीठाची केलेली फसवणूक उघड्यावर येईल या भीतीने रोहितने आत्महत्या केली.



    पण रोहितवर तो दलित असल्यामुळे अत्याचार झाले आणि त्याला विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप आंबेडकर स्टुडंट मुव्हमेंट पासून सगळ्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसने केला. त्यावेळी तेलंगणात केसीआर सरकार सत्तेवर होते. सिकंदराबादचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रोहित वेमुला प्रकरण दाबायचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला.

    खुद्द राहुल गांधींनी तेलंगणामध्ये जाऊन रोहित वेमुला प्रकरणात लक्ष घातले होते. डाव्यांच्या इकोसिस्टीम मध्ये राहुल गांधी तेव्हा फसले होते. रोहित वेमुला दलित असल्यामुळे त्याच्यावर अत्याचार झाले आणि त्याला आत्महत्या करावी लागली, असा दावा राहुल गांधींनी केला आणि दलित विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी स्वतंत्र कायदा बनवून त्या कायद्याला रोहित वेमुलाचे नाव देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात रोहित वेमुला केसची फाईल बंद होताना तेलंगणात आज राहुल गांधींच्या काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आहे आणि त्याच सरकारच्या पोलिसांनी केस बंद करण्यासाठी हायकोर्टात अर्ज केला आहे.

    रोहित वेमुला प्रकरणात कौटुंबिक वादाची देखील किनार होती. रोहितच्या आईने आपण दलित असल्याचा दावा केला होता. परंतु, रोहितच्या वडिलांनी तो फेटाळला होता. रोहितच्या वडिलांनी त्याच्या आईला आधीच घटस्फोट दिला होता. यासंदर्भात पोलिसांनी रोहितच्या आईची डीएनए टेस्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, त्यावर रोहितच्या आईने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे रोहितच्या आईची दलित आयडेंटिटी एस्टॅब्लिश होऊ शकली नाही.

    रोहित वेमुलाची फाईल बंद करताना पोलिसांनी वर उल्लेख केलेल्या सगळ्या बाबी ठळकपणे तिच्यात नोंदविल्या आहेत आणि त्या हायकोर्टाला सादर केलेल्या अर्जाबरोबर जोडल्या आहेत.

    Rohit Vemula case file closed by Telangana Congress government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!