• Download App
    रोहित शर्माने 200 किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याने आरटीओने फाडले तीनदा चलन!! Rohit sharma drives at speed of over 200 kmpl gets 2 challans

    रोहित शर्माने 200 किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याने आरटीओने फाडले तीनदा चलन!!

    वृत्तसंस्था

    पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने मुंबई पुणे प्रवासात 200 ते 215 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने गाडी चालवल्याने आरटीओने त्याचे तीन वेळा चलन फाडले!! Rohit sharma drives at speed of over 200 kmpl gets 2 challans

    रोहित शर्मा आज दुपारी मुंबईहून पुण्याला आला. उद्या पुण्यातील गेहूंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश असा विश्वचषकातला चौथा सामना रंगणार आहे. त्यासाठी रोहित शर्मा आज मुंबईहून पुण्याला येऊन भारताच्या टीम मध्ये सामील झाला.



    भारताने पाकिस्तानी संघाचा अहमदाबाद मध्ये धुव्वा उडवल्यानंतर रोहित शर्मा मुंबईला आपल्या घरी दोन दिवस थांबला होता. त्यानंतर तो आज स्वतःच गाडी चालवत पुण्याला आला. पण त्यावेळी त्याने वेगाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरून त्याने तब्बल 200 ते 215 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने गाडी चालवली. त्यामुळे आरटीओने त्याचे ऑनलाईन तीनदा चलन फाडले!!

    भारतात विश्वचषक स्पर्धा सुरू असताना भारतीय कर्णधाराने मूळात स्वतंत्रपणे अशी एक्सप्रेस वे वरून गाडी चालवत आणणे चुकीचे आहे. रोहित शर्माने आपल्या टीम बरोबरच पोलीस सुरक्षा व्यवस्थेत बीसीसीआयच्या अधिकृत बसनेच प्रवास करायला हवा होता, असे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले.

    Rohit sharma drives at speed of over 200 kmpl gets 2 challans

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य