• Download App
    Rohit Sharma रोहित शर्माने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘

    Rohit Sharma : रोहित शर्माने रचला नवा विक्रम, IPLमध्ये ‘या’बाबतीत झळकावले त्रिशतक!

    Rohit Sharma

    रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा खेळाडू बनला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Rohit Sharma आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला गेला ज्यामध्ये मुंबईचा विजय झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.Rohit Sharma

    त्यानंतर, रोहित शर्मा आणि सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टो यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकून ८१ रन काढले आहे. त्याच वेळी, या सामन्यात २ षटकार मारून रोहित शर्माने आयपीएलमधील आपले ३०० षटकारही पूर्ण केले.



    गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात, सुरुवातीला रोहित शर्माचा झेल दोनदा चुकला, परंतु थोडे सावधगिरीने खेळल्यानंतर, रोहितने पुन्हा फलंदाजी सुरू केली आणि अर्धशतक ठोकले. या दरम्यान, रोहितने २ षटकार मारून आयपीएलमधील आपले ३०० षटकार पूर्ण केले. रोहितने २७१ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गिलने आयपीएलमध्ये एकूण ३५७ षटकार मारले आहेत. सध्या गेलचा विक्रम कुणी मोडेल असे वाटत नाही, पण जर रोहित शर्मा पुढच्या हंगामात खेळला आणि धावा केल्या तर तो गेलचा विक्रम नक्कीच मोडेल. आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आतापर्यंत २९१ षटकार मारले आहेत.

    Rohit Sharma created a new Vikram a shocking triple century in IPL

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    S Jaishankar : एस. जयशंकर यांचं वक्तव्य : शेजारी देशांशी संबंध कायम ठेवणं सोपं नसतं, पण भारताने परिपक्वता दाखवली

    Omar Abdullah : ओमर म्हणाले- ट्रम्प यांना फक्त स्वतःची काळजी; आम्ही त्यांना मित्र समजत होतो

    Sonia Gandhi : सोनिया म्हणाल्या- इराण जुना मित्र, भारताचे मौन अस्वस्थ करणारे; इस्रायली हल्ल्यांवर सरकारकडून विरोधाची अपेक्षा