• Download App
    Rohit Pawar १० आमदारांच्या (शप) राष्ट्रवादीत रोहित पवारांना एकही जबाबदारी नाही; ७ वर्षे पक्षासाठी लढूनही काही उपयोग नाही!!

    Rohit Pawar १० आमदारांच्या (शप) राष्ट्रवादीत रोहित पवारांना एकही जबाबदारी नाही; ७ वर्षे पक्षासाठी लढूनही काही उपयोग नाही!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अवघ्या १० आमदारांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार रोहित पवार यांना एकही जबाबदारी नाही, सात वर्षे पक्षासाठी लढूनही काही उपयोग नाही!!, याविषयी स्वतः रोहित पवारांनी आज विधिमंडळ परिसरात नाराजी बोलून दाखवली. इतकेच काय पण महाराष्ट्रातली जनता विरोधी पक्षांवरच नाराज असल्याचा टोला त्यांनी आपल्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना आणि काँग्रेस + उबाठा शिवसेनेच्या नेत्यांना हाणला. Rohit Pawar

    विधिमंडळ अधिवेशनापूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेऊन काही नेत्यांना महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप केले होते त्यामध्ये हर्षवर्धन पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड वगैरे नेत्यांचा समावेश होता. या प्रत्येक नेत्याला कुठल्या ना कुठल्या विभागात जाऊन पक्षवाढी संदर्भात काय करता येईल, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले होते. पण पण अवघ्या १० आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवारांकडे मात्र एकही जबाबदारी सोपविली नव्हती. त्यामुळे रोहित पवारांना पक्षातून डावलले की काय त्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन मुंबई हायकोर्टाने रोहित पवारांच्या आमदारकी संदर्भात नोटीस काढली. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी देखील धोक्यात आली.Rohit Pawar

    या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार कमालीचे नाराज झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा पोस्टर्स वर झळकवले होते, पण आता त्या भावी मुख्यमंत्र्यांना फक्त १० आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही जबाबदारी पण शिल्लक उरली नसल्याचे चित्र निर्माण झाले. शरद पवारांनी पार्थ पवार प्रमाणेच आपल्या दुसऱ्या नातवालाही राजकीय दृष्ट्या वाऱ्यावर सोडले की काय??, कुजबूज राष्ट्रवादीच्याच वर्तुळातून बाहेर आली.

    या सगळ्या राजकारणाबद्दल मनात असलेली खदखद रोहित पवारांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकारांना बोलून दाखवली. ७ वर्षे पक्षासाठी लढलो पण त्यात आम्ही कमी पडलो, असे वरिष्ठ नेतृत्वाला वाटले असेल, असे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर आमच्या विरोधी पक्षांमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहे, पण जनता मात्र विरोधी पक्षांवर नाराज आहे. कारण जनतेचे प्रश्न घेऊन विरोधी पक्ष लढतानाच दिसत नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी सगळ्याच विरोधी पक्षांना हाणला. Rohit Pawar

    Rohit Pawar very much upset in Sharad Pawar NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!