• Download App
    Rohini Acharya काँग्रेस फुटण्याआधी लालूंचेच कुटुंब तुटले; लालूंना किडनी देणाऱ्या कन्येने राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडले!!

    काँग्रेस फुटण्याआधी लालूंचेच कुटुंब तुटले; लालूंना किडनी देणाऱ्या कन्येने राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडले!!

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहार विधानसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज असे दोन वेळा वर्तविले. परंतु, काँग्रेस फुटण्याआधीच लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब तुटले. लालूंना किडनी देणाऱ्या कन्येने राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडले. Rohini Acharya

    बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल महागठबंधनचा मोठा पराभव झाला. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनला दारुण अपयश आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष फुटण्याचे भाकीत केले.

    पण काँग्रेस पक्ष फुटण्याआधी लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब तुटले. लालूप्रसाद यादव यांना स्वतःची किडनी देऊन त्यांना वाचविणाऱ्या कन्येने म्हणजेच रोहिणी आचार्य यांनी राष्ट्रीय जनता दल आणि लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब हे दोन्ही सोडले. आपण राजकारणापासून आणि लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबापासून दूर होतो आहोत याला कारणीभूत संजय यादव आणि रमीज नेतम खान आहेत, असा आरोप करणारे ट्विट रोहिणी आचार्य यांनी केले.

    संजय यादव आणि रमीज नेतम खान हे दोन जण तेजस्वी यादव यांच्या कार्यालयात राजकीय व्यवस्थापक म्हणून काम बघतात त्या दोघांनी कारवाया करून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातही फूट पाडल्याचे बिहारमध्ये बोलले जात आहे. त्याला रोहिणी आचार्य यांच्या ट्विटमुळे पुष्टी मिळाली.

    Rohini Acharya quitting politics and I’m disowning my family

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : सैन्याने 16,000 फूट उंचीवर मोनोरेल चालवली; गजराज कॉर्प्सने उभारली; अरुणाचलच्या पर्वतीय भागात पोहोचेल मदत

    Karnataka : कर्नाटकात ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; 100 हून अधिक ट्रॅक्टर जाळले; ऊसाला प्रति टन 3,500ची मागणी

    BBC : BBCने ट्रम्प यांची माफी मागितली, भरपाई नाकारली; म्हटले- राष्ट्रपतींचे नुकसान नाही; ₹8,400 कोटींची होती नोटीस