• Download App
    रॉबर्ट वाड्रा वयाच्या साठाव्या वर्षी "फिरोज गांधी" बनणार!!; "स्व"कर्तृत्वावर राजकारणात चमकणार!!|Robert Vadra wants to contest election on his own capacity

    रॉबर्ट वाड्रा वयाच्या साठाव्या वर्षी “फिरोज गांधी” बनणार!!; “स्व”कर्तृत्वावर राजकारणात चमकणार!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सोनिया गांधींचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा वयाच्या साठाव्या वर्षी “फिरोज गांधी” बनणार!!; ते “स्व”कर्तृत्वावर राजकारणात चमकणार!!Robert Vadra wants to contest election on his own capacity

    स्वतः रॉबर्ट वाड्रा यांनीच ही मनाची मनीषा बोलून दाखवली आहे. देशातून विशेषता काँग्रेस पक्षातून अशी मागणी उठली होती की आपण 2024 च्या निवडणुकीत आम्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. परंतु काँग्रेसने वेगळा निर्णय घेतला. हरकत नाही. आपण ही निवडणूक नाही तर पुढची निवडणूक लढवू असे वक्तव्य रॉबर्ट वाड्रा यांनी केले आहे. आपण गांधी परिवाराचा जावई म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कामावर ही निवडणूक लढवू, असेही रॉबर्ट वाड्रा यांनी स्पष्ट केले आहे. यातूनच त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी “फिरोज गांधी” बनवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.



    कोण होते फिरोज गांधी??

    रॉबर्ट वाड्रा हे वयाच्या साठाव्या वर्षी “फिरोज गांधी” बनणार हे नेमके काय होणार?? आणि ते “फिरोज गांधीच” का बनणार??, तर या प्रश्नांनाही उत्तरे त्यांच्याच उत्तरात दडली आहेत. फिरोज गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यात विशिष्ट साम्य आहे, ते म्हणजे हे दोघेही गांधी नेहरू परिवाराचे जावई आहेत. पण फिरोज गांधी ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे कार्य करून स्वबळावर लोकसभेवर निवडून जायचे ते प्रसंगी पंतप्रधान पंडित नेहरूंना देखील विरोध करायचे. त्यामुळे ते संपूर्ण देशभर स्वतंत्र प्रतिभेचे आणि प्रज्ञेचे खासदार म्हणून ओळखले जायचे. ते काँग्रेसचे खासदार जरूर होते, परंतु त्यांनी पंडित नेहरू यांच्याशी मतभेद व्यक्त करण्याचे कधी सोडले नव्हते. त्यामुळे फिरोज गांधींची देशभरातली प्रतिमा “नेहरूंचे जावई” यापेक्षा एक “बंडखोर खासदार” म्हणून अधिक होती.

    रॉबर्ट वाड्रा यांनी थेटपणे आपण “फिरोज गांधी” बनणार असे बोलून दाखवलेले नाही. पण ज्या अर्थी ते 2024 ची नव्हे तर 2029 ची निवडणूक लढवणार आहेत, त्याअर्थी ते वयाच्या साठव्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात येणार आहेत. कारण रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म 1969 चा आहे आणि लोकसभेची निवडणूक 2029 मध्ये होणे अपेक्षित आहे. तेव्हा रॉबर्ट वाड्रा वयाच्या साठीत पोहोचलेले असतील. रॉबर्ट वाड्रा अर्थातच काँग्रेस मधूनच निवडणूक लढवणार आहेत. कारण त्यांना भाजपची धोरणे पसंत नाहीत. काँग्रेसमध्ये राहून आपण निवडणूक लढवू, पण गांधी परिवाराचा जावई म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कामावर निवडणूक लढवू असे वक्तव्य रॉबर्ट वाड्रा यांनी केले आहे. याचा अर्थ त्यांना काँग्रेस मधले नवे “फिरोज गांधी” बनायचे आहे!!

    आता रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस मधून कदाचित 2029 ची निवडणूक लढवतीलही, ते स्वकर्तृत्वावर चमकण्याचा प्रयत्न करतीलही, पण ते थेट गांधी नेहरू परिवाराला आव्हान देणारी फिरोज गांधींसाठी कामगिरी करू शकतील का??, तेवढी त्यांची क्षमता आहे का?? नेहरूंनी फिरोज गांधींची बंडखोरी खपवून घेतली किंबहुना त्यांना ती खपवून घ्यावी लागली, पण गांधी परिवार रॉबर्ट वाड्रांची संभाव्य बंडखोरी खपवून घेईल का??, हा खरा सवाल आहे!!

    Robert Vadra wants to contest election on his own capacity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी