• Download App
    अवघ्या 32 मिनिटांत 20 कोटी रुपयांचा दरोडा... डेहराडूनच्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये धनत्रयोदशीपूर्वी मोठी घटना Robbery of Rs 20 crores in just 32 minutes Big incident before Dhantrayodashi at Dehradun's Reliance Jewelery Showroom

    WATCH : अवघ्या 32 मिनिटांत 20 कोटी रुपयांचा दरोडा… डेहराडूनच्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये धनत्रयोदशीपूर्वी मोठी घटना

    वृत्तसंस्था

    डेहराडून : उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये धनत्रयोदशीच्या अवघ्या 32 मिनिटांपूर्वी दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेलरी शोरूम फोडून 20 कोटींचे दागिने घेऊन पलायन केले. शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी चोरट्यांनी काहींना बंदुकीच्या धाकावर नेले आणि काहींना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. Robbery of Rs 20 crores in just 32 minutes Big incident before Dhantrayodashi at Dehradun’s Reliance Jewelery Showroom

    दरोडेखोर निघून गेल्यानंतरही काही महिला कर्मचाऱ्यांना भीतीने आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, चार चोरटे शोरूममध्ये घुसले आणि त्यांचे काही साथीदारही बाहेर उभे होते. राजपूर रोडवर असलेल्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये दरोड्याची ही घटना घडली.

    अवघ्या 32 मिनिटांत दरोडा

    राजपूर रोडवर असलेले शोरूम सकाळी 10.15 वाजता उघडले होते. शोरूमचे 11 कर्मचारी ग्राहक येण्यापूर्वीच दागिन्यांची व्यवस्था करत होते. डिस्प्ले बोर्डमध्ये 20 कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. सकाळी 10.24 वाजता मास्क घातलेले चार चोरटे शोरूममध्ये घुसले.

    त्यांनी आधी सुरक्षा रक्षक हयात सिंगला आत ओढले. यानंतर शोरूममधील संपूर्ण कर्मचार्‍यांना बंदुकीच्या धाकावर ओलिस करून सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध केला असता हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली.


    उत्तराखंड : मोदींनी अल्मोडातील सहा हजारांपेक्षाही अधिक फूट उंचीवरील जागेश्वर धाम येथे केली पूजा


    यानंतर हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांचे हात प्लास्टिकच्या बँडने बांधले आणि शोरूमच्या पॅन्ट्री रूममध्ये (स्वयंपाकघर) सर्वांना कोंडले. काही महिला कर्मचाऱ्यांना धमकावून डिस्प्ले बोर्डवर लावलेले दागिने काढून बॅगमध्ये टाकण्यास भाग पाडले. यानंतर चोरट्यांनी तीन महिला कर्मचाऱ्यांना किचनमध्ये कोंडले. 10.56 वाजता दरोडेखोरांनी दागिने बॉक्समध्ये भरून घटनास्थळावरून पळ काढला.

    आजूबाजूलाही वर्दळ होती, तरी कोणालाच कल्पना आली नाही

    हे शोरूम राजपूर रोडवरील ग्लोब चौकाजवळ आहे. ज्या कॉम्प्लेक्समध्ये शोरूम आहे ती चार मजली इमारत असून तळघरात पार्किंग आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते मात्र चोरट्यांनी अर्धा तास शोरूममध्ये लूटमार सुरू ठेवल्याची कोणालाही याची कल्पना आली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हाच आसपासच्या लोकांना दरोड्याची घटना घडल्याचे समजले. मात्र, दरोडेखोर पळून जात असताना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले. ते दरोडा टाकण्यासाठी दुचाकीवरून आले होते.

    सीएम धामी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बोलावले

    राजधानीत चोरीच्या इतक्या मोठ्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कठोर भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालक अशोक कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एपी अंशुमन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि बैठकीनंतर लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले.

    Robbery of Rs 20 crores in just 32 minutes Big incident before Dhantrayodashi at Dehradun’s Reliance Jewelery Showroom

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती