विशेष प्रतिनिधी
पाटस : पाटस ( ता. दौंड ) येथे पोलीस असल्याचे भासवून एस टी मधील चार प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले. मंगळवारी मध्यराञीच्या सुमारास घडली.निलंगा – भिवंडी या एस. टी. मधून कुरियर सर्व्हिस करणारे हितेंद्र जाधव ( वाघोशी , ता. फलटण ) विकास बोबडे , तेजस बोबडे , संतोष बोबडे (तिघे रा. फलटण , जि. सातारा ) हे चौघे प्रवास करीत होते.Robbery at Patas on Solapur road, ST passengers one deore 25 lakhs looted
त्यांच्याकडे १ कोटी १० लाख रुपये रोख आणि दिडशे ग्राम मेटल होते. एसटी पाटस येथील ढमालेवस्ती परिसरात राञी एक वाजण्याच्या सुमारास आली असता चौघांनी अडवली.त्यांच्या हातात काठ्या , खाकी पॅन्ट परिधान केलेले आणि पायात बुट असा पेहराव असल्याने बस चालकाला पोलीस असल्याचे वाटले.
त्याने बस थांबवली असता कंडक्टरने दरवाजा ऊघडताच या चौघांनी काठ्या आपटत पोलीस तोऱ्यात शिवीगाळ करुन कुरियरवाले कोण आहेत असे विचारले बस मध्ये पाठीमागे बसलेले चौघे ऊठले तेव्हा त्यांच्या शर्टच्या काॕलर पकडत त्यांना एसटी मधून बाहेर काढले आणि एसटी चालकाला जायला सांगीतले. एसटी गेल्यावर या चौघांना मारहाण करीत त्यांच्या कडील रक्कम आणि मेटल हिसकावून घेतले आणि दोन दुचाकी वाहनावावरुन चोरटे पळून गेले.
Robbery at Patas on Solapur road, ST passengers one deore 25 lakhs looted
महत्त्वाच्या बातम्या
- जाता जात नाही ती जात : गुगलवर खेळाडूंची जात शोधताहेत लोक, साक्षी मलिक – पीव्ही सिंधूची जात शोधण्यात राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र- तेलंगण, बिहारचे लोक जास्त
- भाजप संसदीय गटाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले – संसद चालवू न देणे हा विरोधकांकडून लोकशाही आणि जनतेचा अपमान
- कोरोनाने जनता बेजार, पण दिल्लीच्या आमदारांना वाढवून पाहिजे पगार, केजरींच्या कॅबिनेट बैठकीत आज प्रस्ताव येण्याची शक्यता
- वसुली प्रकरणात आता डॉन छोटा शकीलची एंट्री, माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध सुरू आहे चौकशी