• Download App
    Tejashwi Yadav अहमदाबाद विमान अपघातात प्रकरणी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांचं निलंबन

    बिहारच्या तिकीट वाटपाचे “रहस्य” बाहेर?; कोण कुणाची तिकिटे वाटणार??

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे बिहार मधले दौरे वाढले. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांचे सत्ताधारी पक्षांवरचे हल्ले देखील वाढत चालले.

    लालू प्रसाद यादवांच्या वाढदिवसाच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर त्यांच्या पायापाशी ठेवल्याचा वाद उसळला. काँग्रेस आणि राजद यांनी नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. दलित, पिछडे, आदिवासींचा राजकीय वापर केला. पण मोदींनी आंबेडकरांना नेहमी स्वतःच्या मनात स्थान दिले. दलित, पिछडे आदिवासींना सामाजिक न्याय दिला, असे मोदी म्हणाले. मोदींच्या या भाषणाची मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्तुती केली.

    नितीश कुमारांच्या वक्तव्यावर तेजस्वी यादव यांनी टीका केली. नितीश कुमार यांना सध्या स्मृतीभ्रंश झालाय. ते राजकीय दृष्ट्या बेशुद्ध अवस्थेत गेलेत. त्यामुळे भाजपला फायदा होणार आहे. त्यांच्या जनता दल युनायटेड पक्षाची तिकिटे नितीश कुमार वाटणार नाहीत तर अमित शाह वाटणार आहेत. संजय झा हे देखील भाजप मधल्या अरुण जेटलींच्या कोट्यातूनच जनता दल युनायटेड मध्ये आले आणि खासदार झाले, असे टीकास्त्र तेजस्वी यादव यांनी सोडले.

    पण काँग्रेस आणि राजद यांची आघाडी कधी होणार?, दोन्ही पक्षांच्या चर्चेच्या फेऱ्या पुढे का सरकल्या नाहीत?, राजद आणि काँग्रेस यांची तिकिटे कोण वाटणार?, या सवालांची उत्तरे तेजस्वी यादव यांनी दिली नाहीत.

    RJD leader Tejashwi Yadav says

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम

    अंबालामध्ये राष्ट्रपतींसोबत ऑपरेशन सिंदूरची पायलट; स्क्वॉड्रन लीडर शिवांगी यांना पाकिस्तानने पकडल्याचा दावा केला होता

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर