• Download App
    लालूंच्या दोन मुलांमधला राजकीय वाद उफाळला; तेज प्रताप समर्थकाला राजद युवक अध्यक्षपदावरून हटविले RJD Bihar Pres Jagdanand Singh thinks that it's his party. Party constitution wasn't followed, why no notice was issued to our student leaders?

    लालूंच्या दोन मुलांमधला राजकीय वाद उफाळला; तेज प्रताप समर्थकाला राजद युवक अध्यक्षपदावरून हटविले

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांमधला राजकीय वाद उफाळून आला आहे. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यात आधीच विस्तव जात नसताना आता राष्ट्रीय जनता दलाचा युवक अध्यक्ष आकाश यादव याला हटविल्यानंतर तेजप्रताप यादव संतापला आहे. आकाश यादव हा तेज प्रताप यादव याचा समर्थक आहे. RJD Bihar Pres Jagdanand Singh thinks that it’s his party. Party constitution wasn’t followed, why no notice was issued to our student leaders?

    तेज प्रताप यादव याने आपले वडील लालूप्रसाद यादव यांना या प्रकरणात लक्ष घालायचे आवाहन केले असून आपल्या समर्थककाला पुन्हा सन्मानाचे पद दिले नाही तर राष्ट्रीय जनता दलाच्या एकाही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

    दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी आपण आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष पक्षांमधले मतभेद मिटवायला समर्थ आहोत. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ, असे सांगून तेज प्रताप यादव याच्या रागात आणखीनच भर घातली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगत आनंद यादव यांनी या वादामध्ये आणखी भर घातली असून कोण तेजप्रताप यादव??, मी ओळखत नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना उत्तरदायी आहे. इतरांना नाही. तेजप्रताप यादव हे राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 75 सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मी त्यांना उत्तरदायी नाही. जे काही विचारायचे ते मला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव विचारतील. त्यांना मी उत्तर देईन, असे जगत आनंद यादव यांनी म्हटले आहे.

    त्यामुळे लालूप्रसाद यांच्या दोन मुलांमधील राजकीय मतभेद आणि त्यातून पक्षात फूट पडते की काय अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. तेजस्वी यादव यांची पक्षावर पकड आहे त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. त्या तुलनेत तेजप्रताप यादव यांचा प्रभाव बिहारमध्ये फारसा नाही परंतु तरीही मर्यादित प्रभाव क्षेत्राच्या आधारे तेजप्रताप यादव राष्ट्रीय जनता दलात फूट पाडू शकतो.

    RJD Bihar Pres Jagdanand Singh thinks that it’s his party. Party constitution wasn’t followed, why no notice was issued to our student leaders?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची