• Download App
    अभिमानास्पद : ‘रॉकेट वुमन’ म्हणून परिचत असलेल्या रितू करिधाल करताय ‘चांद्रयान-३’ मोहीमेचं नेतृत्व! Ritu Karidhal who is known as Rocket Woman has the leadership of Chandrayaan 3 mission

    अभिमानास्पद : ‘रॉकेट वुमन’ म्हणून परिचत असलेल्या रितू करिधाल करताय ‘चांद्रयान-३’ मोहीमेचं नेतृत्व!

    ऐतिहासिक चांद्र मोहीमेचं नेतृत्व महिलेच्या हाती आल्याने समस्त भारतीयांसाठी अभिमानस्पद बाब

    विशेष प्रतिनिधी

    श्रीहरीकोटा : आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. आज चांद्रयान-३ चे प्रक्षेपण होत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे रात्रंदिवस काम केले. चांद्रयान-3 ची तयारी आता पूर्ण झाली असून, दुपारी 2.35 वाजता लॉन्च होणार आहे. अशा परिस्थितीत जगासमोर भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या चांद्रयान-३ चे नेतृत्व कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Ritu Karidhal who is known as Rocket Woman has the leadership of Chandrayaan 3 mission

    चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या इस्रोच्या टीममध्ये रितू करिधाल यांचाही समावेश आहे. रितू लॉन्चिंग टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.

    रितू करिधाल या लखनऊ विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्या लखनऊ शहरातील राजाजीपुरम येथील रहिवासी असून, त्यांचे शालेय शिक्षण नवयुग गर्ल्स कॉलेज, लखनऊ येथे झाले. यानंतर त्यांनी 1991 मध्ये त्यांनी लखनऊ विद्यापीठातून बीएससी फिजिक्स केले. 1996 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. त्यांना लहानपणापासूनच अवकाश भौतिकशास्त्रात रस होता. त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडीसाठी प्रवेश घेतला परंतु 1997 मध्ये सहा महिन्यांच्या आत त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये निवड झाली. इस्रोमध्ये निवड झाल्यानंतर त्यांना पीएचडी पूर्ण करता आली नाही.

    चांद्रयान-2 ची भूमिका पाहून इस्रोने चांद्रयान-3 उतरवण्याची जबाबदारी रितू यांच्या हातात दिली आहे. रितू यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अनेकजण हे मिशन यशस्वी करण्यात गुंतले आहेत. रितू या मिशनच्या डायरेक्टरची भूमिका निभावत आहेत. रितू या मंगलयान मिशनच्या ऑपरेशन डेप्युटी डायरेक्टर होत्या. रितू करिधाल यांनी इस्रोमध्ये इतर अनेक भूमिकाही निभावल्या आहेत. एरोस्पेसमध्ये तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या रितू यांनी चांद्रयान-2 मध्ये मिशन डायरेक्टरची जबाबदारीही सांभाळली आहे. कामाच्या आवडीमुळेच त्यांनी इस्रोमध्ये आपला ठसा उमटवला आहे. इस्रोच्या विविध मोहिमांमध्येही त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

    रितू यांना त्यांच्या उल्लेखनीय कामांसाठी ‘रॉकेट वुमन, म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय रितू यांना 2007 मध्ये यंग सायंटिस्ट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट अवॉर्ड, मार्स ऑर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अवॉर्डही रितू यांना मिळाले आहेत.

    Ritu Karidhal who is known as Rocket Woman has the leadership of Chandrayaan 3 mission

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे