वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोविड-19 टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने कोरोनाचा नवा व्हेरिएंट स्टेल्थ ओमीक्रोनाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे देशात त्याची नवी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.Risk of stealth omikrona; Covid Task Force alert; A sign of a new wave in the country
स्टेल्थ ओमीक्रोमची पुढची लाट ६ ते ८ महिन्यांमध्ये येऊ शकते. ओमायक्रॉनचा सब -व्हेरिएंट BA.2 हा BA.1 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे.आपण ओमायक्रॉनच्या शेवटच्या टप्प्यात असून मात्र हा विषाणू आपल्या आसपासच आहे. त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक शक्य असलेला प्रयत्न करायला हवा.
ओमायक्रॉन BA.2 मुळे आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे का? याबद्दल बोलताना कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्याने म्हटलं की BA.2 त्या लोकांना संक्रमित करू शकत नाही, ज्यांना आधीपासूनच कोविडच्या BA.1 सब व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता.
डॉ. जयदेवन यांनी सांगितलं की ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 मुळे आणखी एक लाट येणार नाही. स्टेल्थ ओमीक्रोनाचा लोकांना संक्रमित करू शकत जे BA 1 ची लागण होऊन बरे झाले आहेत. हा एखादा नवीन व्हायरस किंवा स्ट्रेन नाही. तर BA2 हा ओमायक्रॉनचाच एक सब-व्हेरिएंट आहे.
डॉ. जयदेवन म्हणाले की ओमिक्रॉन प्रमाणेच भविष्यातील कोरोना प्रकार देखील लस रोगप्रतिकारक गुणधर्म दर्शवू शकतात. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणू आपली ताकद वाढवण्यासाठी सतत विकसित होत आहे. यामुळे याची अधिक लोकांना संक्रमित करण्याची आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि लसीकरण प्रतिकारशक्तीला पराभूत करण्याची क्षमता आहे.
Risk of stealth omikrona; Covid Task Force alert; A sign of a new wave in the country
महत्त्वाच्या बातम्या
- विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीची परिस्थिती
- सैन्य पाठवून रशियाची युक्रेन मध्ये फुटीरांना उघड मदत युक्रेन लष्कर व फुटीरतावादी यांच्यातील युद्ध प्रखर
- शिवसेना – भाजप भांडताहेत, काँग्रेस – राष्ट्रवादीवाले बाहेरून मजा पाहताहेत!!; माजी खासदार शिवाजी मानेंनी दाखवला आरसा!!
- नारायण राणेंबद्दल महिला आयोगाकडे तक्रार मुंबईच्या महापौरांच्या अर्जावर कार्यवाही सुरू