• Download App
    भारतात गृहिणींमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण! का दरवर्षी २०००० पेक्षा जास्त गृहिणी आपले आयुष्य संपवतात? Rising suicide rate among housewives in India

    भारतात गृहिणींमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण! का दरवर्षी २०००० पेक्षा जास्त गृहिणी आपले आयुष्य संपवतात?

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : संपूर्ण जगामध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण भारतामध्ये सर्वाधिक आहे. जगभरात होणाऱ्या आत्महत्यांपैकी 25 टक्के भारतीय पुरुष दरवर्षी आत्महत्या करतात. तर जगभरातील 15 ते 39 वयोगटाच्या आत्महत्यांमध्ये देखील भारतीय महिलांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 36 टक्के इतके आहे.Rising suicide rate among housewives in India

    नुकताच केंद्र सरकारच्या नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरोने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये एकूण 22372 गृहिणींनी आत्महत्या करून आपला जीव गमावला आहे. म्हणजे सरासरी रोज 61 गृहिणींनी आत्महत्या केली. म्हणजेच 25 मिनिटाला 1 आत्महत्या झाली.



    2020 मध्ये भारतात एकूण 1, 53, 052 आत्महत्या नोंद झाल्या होत्या. यापैकी 14.6 टक्के आत्महत्या या हाऊसवाईफ असणार्या महिलांनी केल्या होत्या. आत्महत्या करणार्या आणि स्वत:चा जीव देणार्या एकूण महिलांच्या तुलनेत गृहिणींच्या आत्महत्येचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे.

    कौटुंबिक हिंसाचार हे या आत्महत्येचे मुख्य कारण आहे. कौटुंबिक समस्या असणे, लग्नासंबंधी समस्या असणे आणि लहान वयात लग्न होणे त्यामुळे आपल्या भविष्याविषयी काय करायचे हे बऱ्याच महिलांना कळत नाही. शेवटी निराशा, एकटेपणा, समाजाची भीती, मानसिक कुचंबणा यातून त्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. असे वाराणसी मधील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ उषा वर्मा श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

    हा आकडा फक्त मागच्या वर्षीचा नाहीये. तर दरवर्षी भारतात सुमारे 20000 पेक्षा जास्त गृहीणी स्वत:चं आयुष्य संपवतात. 2009 मध्ये हा आकडा 25092 इतका होता.

    कोरोना काळामध्ये लॉकडउन होते. त्यामुळे सर्वजण जवळपास घरीच होते. आधी पुरुष कामा निम्मित घराबाहेर पडले की, स्त्रियांना श्वास घयायला थोडाफार वेळ मिळायचा. पण कोरोनामुळे आणि लॉक डाऊनमुळे बऱ्याच स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वात जास्त तक्रारी लॉकडाऊनच्या काळामध्येच नाेंद करण्यात आल्या होत्या.

    Rising suicide rate among housewives in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!