ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे लेबर पार्टीचे केयर स्टारमर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. तर ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. 650 पैकी 400 जागा पार करत लेबर पार्टीने 14 वर्षांनंतर जोरदार पुनरागमन केले आहे. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पक्षाचा पराभव स्वीकारला आहे. सुनक यांनी मात्र त्यांची जागा जिंकलेली. त्यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थलर्टन जागा 23,059 मतांनी जिंकली.Rishi Sunak resigned as leader of the Conservative Party after the election defeat
निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी जनतेला सांगितले की “मी तुमचा राग, तुमची निराशा ऐकली आहे आणि मी या पराभवाची जबाबदारी घेतो.” सुनक यांनी स्टॉर्मरचे अभिनंदन केले आहे.
ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे लेबर पार्टीचे केयर स्टारमर यांनी हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रस या जागांवर विजय मिळवला. लेबर पार्टीच्या विजयावर 61 वर्षीय स्टारर म्हणाले, ‘मी तुमचा आवाज होईन, मी तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमच्यासाठी दररोज लढेन.’ स्टारमरने विजयानंतर शुक्रवारी सकाळी विजयी भाषण केले. त्यात ते म्हणाले की, देशाला “14 वर्षानंतर आपले भविष्य परत मिळाले आहे.”
Rishi Sunak resigned as leader of the Conservative Party after the election defeat
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले; ज्या राजभवनात अटक केली, तिथेच 156 दिवसांनी घेतली शपथ
- टीम इंडियाला मिळाला असा सन्मान जो आजपर्यंत ना कोणत्या पंतप्रधानांना मिळा ना मुख्यमंत्र्यांना!
- हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!
- अदानीचे शेअर्स विकत घेऊन जगणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अदानी बद्दल विचारू नये’