• Download App
    ऋषी सुनक यांची निवड म्हणजे सोनिया गांधींचा मार्ग प्रशस्त होणे आहे काय??Rishi Sunak becoming prime minister of Britain is it paving the way of Sonia Gandhi in India to become the prime minister??

    ऋषी सुनक यांची निवड म्हणजे सोनिया गांधींचा मार्ग प्रशस्त होणे आहे काय??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड होणे यावरून भारतातल्या माध्यमांमध्ये आणि लिबरल्स मध्ये जे आनंदाचे वातावरण पसरले आहे, त्याचे कारण त्यांचे भारतीय असण्यापेक्षा वेगळेच असल्याचे दिसत आहे. ते म्हणजे ऋषी सुनक यांच्यासारखे भारतीय वंशाचे नेते जर ब्रिटनचे पंतप्रधान बनू शकतात, तर सोनिया गांधी यांच्यासारख्या इटालियन वंशाच्या पंतप्रधान नेत्या भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत??, हा तो मुद्दा आहे!! Rishi Sunak becoming prime minister of Britain is it paving the way of Sonia Gandhi in India to become the prime minister??

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अतिशय उच्चशिक्षित भाषेत हा मुद्दा चतुराईने उपस्थित केला आहेच. तो करताना त्यांनी भारताला उदारमतवादाची शिकवणी दिली आहे. उदारमतवाद जोपासला की कुठलीही व्यक्ती कोणत्याही देशाची पंतप्रधान बनू शकते, असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. इतकेच नाहीतर काही माध्यमांनी त्या पलिकडे जाऊन भारतीय आणि उदारमतवादी वृत्ती कशी जोपासली पाहिजे याची लेक्चरबाजी केली आहे. ऋषी सुनक कर्तृत्ववान आहेत त्यांनी आपले कर्तृत्व दाखवले म्हणून ते ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर बसू शकले. बाकी ते मूळ भारतीय वंशाचे असल्याचा टेंभा काहीजणांनी अवश्य मिरवावा. पण त्यांचे पंतप्रधानपद हा त्यांच्या भारतीयत्वापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आहे, असा युक्तिवाद या माध्यमांनी केला आहे. पण हा युक्तिवाद निखळ आणि तटस्थ नाही.

    चिदंबरम यांचा युक्तिवाद आणि माध्यमांचा युक्तिवाद याच्यामध्ये एक सुप्त इच्छेचा मुद्दा दडला आहे आणि तो थेट सोनिया गांधी यांच्याशी संबंधित आहे. जणू काही भारताने उदारमतवाद स्वीकारला की सोनिया गांधी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग प्रशस्त होईल आणि त्यांचा परकीयत्वाचा मुद्दा आपोआपच बाजूला पडेल, असा यामागे राजकीय होरा दिसतो आहे.


    ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्यानंतर पाकिस्तान्यांना आठवले सुनक कुटुंबीयांचे मूळ गाव!!


    पण तशी वस्तुस्थिती आहे का??, याचा बारकाईने विचार केला तर ऋषी सुनक यांचे पंतप्रधान बनणे आणि सोनिया गांधींना भारतात तशी संधी असणे यात मूलभूत अंतर आहे. ते केवळ राजकीय परिस्थितीचे नाही, तर मूलभूत मनोवृत्तीचे देखील आहे. ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्षांची गुलामी लादली. त्यांनी वर्ण वर्चस्ववादाच्या तत्त्वज्ञानाचे समर्थन करून भारतावर राज्य केले. सोनिया गांधी या इटालियन वंशाच्या आहेत. किंबहुना त्या वर्ण वर्चस्ववादी युरोपीय वंशाच्या असल्याने भारतीयांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते म्हणून त्यांना पंतप्रधान पदाची संधी भारतीयांनी एकदा नव्हे, तर दोनदा लोकसभा निवडणुकीतील मतदानाद्वारे नाकारली आहे. पण ऋषी सुनक यांच्या संदर्भातला युक्तिवाद करताना भारतातल्या तथाकथित लिबरल्सना हे मान्य नाही.

    शिवाय ऋषी सुनक हे काही वर्ण वर्चस्ववादाच्या तत्त्वज्ञानानुसार ब्रिटनवर राज्य करायला गेलेले नेते नव्हेत. त्यांचे आजोबा, वडील नोकरी धंद्याच्या निमित्ताने परदेशात गेले. तेथे आपापल्या वकूबानुसार आणि कर्तृत्वानुसार मोठे झाले. ऋषी सुनक हे त्या परंपरेतले आपले कर्तृत्व सिद्ध करून ब्रिटनचे पंतप्रधान होणारे नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वात वर्ण वर्चस्ववादाचा लवलेशही नाही. त्यामुळे ऋषी सुनक आणि सोनिया गांधी यांचा बादरायणी संबंध जोडणे आणि तशी सुप्त इच्छा मनात बाळगणे हेच मूळात राजकीय सामाजिक आणि उदारमतवादाच्या दृष्टीने अयोग्यच आहे. मग तो युक्तिवाद कितीही उच्चशिक्षित भाषेत केला असो त्यातली चतुराई आणि फोलपण निश्चित लक्षात येते!!

    Rishi Sunak becoming prime minister of Britain is it paving the way of Sonia Gandhi in India to become the prime minister??

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!