केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांनी भाजपची तिथे घोड्यावरून एन्ट्री केली, तर काँग्रेसची हत्तीवरून केली पण त्यामुळेच हत्तीवर बसविलेले नेते त्याच्यावर स्थिर राहतील का??, हा सवाल तयार झाला.
केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने जोरदार कमबॅक करत सत्ताधारी कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा दारुण पराभव केला. तिरुअनंतपुरम वगळता सगळ्या महापालिका काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने जिंकल्या. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदांमध्ये कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा सुपडा साफ केला. Kerala Congress
पण केरळ मधून खरी बातमी आली, ती केरळची राजधानी तिरुअनंतपुरम मधून. कारण तिथे भाजपने पहिल्यांदाच कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट आणि काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यावर मात करून महापालिकेची सत्ता मिळविली. तिरुअनंतपुरम मध्ये कम्युनिस्ट पार्टीने केलेला सर्वांत तरुण महिला महापौर हा प्रयोग फसला. त्या प्रयोगाची फार मोठी राजकीय किंमत कम्युनिस्ट पार्टीला चुकवावी लागली. पण ती काँग्रेसने वसूल करण्याऐवजी भाजपने वसूल केली. त्यामुळे केरळ कौमुदी या वर्तमानपत्राने भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना घोड्यावर बसवलेले कार्टून काढले. भाजपच्या विजयाची हेडलाईन केली, तर काँग्रेसच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना हत्तीवर बसविलेले कार्टून काढून त्यांना दुय्यम स्थान दिले.
केरळ मधल्या राजकारणाचे अतिशय चपखल वर्णन करणारी ही कार्टून्स ठरली.
– काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळण्याची भीती
कारण केरळमध्ये फक्त तिरुवनंतपुरम मध्ये जरी भाजपने विजय मिळविला असला, तरी भाजपची ज्या पद्धतीने आणि ज्या दणक्यात केरळच्या राजकीय नकाशावर एन्ट्री झाली आहे, ते पाहता केरळमध्ये भाजप लवकर घोडदौड करू लागेल. त्या उलट केरळ मधल्या काँग्रेसचे हत्तीवर बसविलेले नेते विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्याच्या लालसेने एकमेकांना हत्तीवरून ढकलून देऊन पाडतील आणि स्वतःही पडतील, हीच दाट शक्यता आहे. कारण हत्तीवर बसविलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ, काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल, रमेश चेन्निथला, के. सुधाकरन, मुलापल्ली रामचंद्रन यांना लगेच मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेत. केरळ मध्ये काँग्रेसच्या विजयाने सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. त्यामुळे तिथे काँग्रेसच्या नेहमीच्या पद्धतीने गटबाजी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.
– हरियाणात गटबाजीमुळेच पराभव
अशा गटबाजीचा प्रत्यय काँग्रेसने हरियाणा घेतला. तिथे काँग्रेसच्या विजयाची 100 % शक्यता असताना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी बाकीच्या काँग्रेसने त्यांना बाजूला सारत स्वतःच्याच गटाच्या लोकांना तिकिटे दिली त्यामुळे हरियाणा बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी हुड्डांना आस्मान दाखविले. हरियाणा भाजपची जिंकण्याची शक्यता नसताना भाजपला जिंकून दिले. तसेच केरळ मध्ये हत्तीवर बसविलेले काँग्रेसचे नेते करणार नाहीत, याची गॅरंटी कोण घेणार??, हा सवाल केरळ कौमुदी मधल्या कार्टून मुळे ठळकपणे समोर आलाय.
Rift in Kerala Congress may emerge soon
महत्वाच्या बातम्या