• Download App
    कोरोना काळात अतिश्रीमंतांच्या संपत्तीत अफाट भर, गरीबांचे खिसे रिकामेच।Rich people becomes more rich in world during corona period

    कोरोना काळात अतिश्रीमंतांच्या संपत्तीत अफाट भर, गरीबांचे खिसे रिकामेच

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूंचा प्रसार जसजसा झपाट्याने होत गेला, तसतसा त्याचे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. परिणामी, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आपापल्या देशातील अर्थव्यवस्था तरती ठेवण्यासाठी तब्बल नऊ ट्रिलियन अमेरिकी डॉलर ओतले. यातील बहुतांश भाग हा भांडवली बाजारपेठांमध्ये गुंतवला गेल्याने अतिश्रीमंतांच्या संपत्तीत आणखी भर पडली आहे. Rich people becomes more rich in world during corona period

    ‘फोर्ब्स मासिकाने तयार केलेल्या अब्जाधिशांच्या यादीमध्ये ही स्थिती प्रतिबिंबित झाली आहे. गेल्या १२ महिन्यांत अमेरिका व चीनमधील वाढ दर्शविणाऱ्या आघाडीच्या १० अब्जाधिशांच्या संपत्तीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे, जी काही काळापूर्वी अशक्यप्राय वाटायची. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ‘टेस्ला’चे संस्थापक इलॉन मस्क यांची संपत्ती २५ अब्ज अमेरिकी डॉलरवरून १५० अब्ज अमेरिकी डॉलर झाली.



    जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरवरून तब्बल १३ लाख कोटी अमेरिकी डॉलरपर्यंत जाऊन पोचली आहे. एवढ्या मोठ्या वाढीची नोंद कधीच झाली नव्हती. याशिवाय, गेल्या वर्षात अब्जाधीशांची संख्या देखील लक्षणीयरित्या वाढली आहे. या निमित्ताने वाढती आर्थिक असमानता हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे. ही वाढती असमानता पाहून भांडवलशाहीविरोधात पडसाद उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अतिश्रीमंतांच्या या चक्रावून टाकणाऱ्या आकडेवारीमुळे अमेरिकेतील अब्जाधिशांवर अधिक कर आकारण्याची मागणी तेथे होऊ लागली आहे.

    इतर देशांप्रमाणेच भारतात देखील हीच परिस्थिती दिसून येत आहे. भारत तुलनेने गरीब असूनही एकूण जीडीपीच्या तुलनेत अब्जाधिशांच्या संपत्तीत झालेली वाढ ही जगातील सर्वांत जास्त झालेल्या वाढीपैकी एक आहे.

    Rich people becomes more rich in world during corona period

    Related posts

    Al Falah Group : दिल्ली स्फोटप्रकरणी अल फलाह ग्रुपच्या सचिवाला अटक; खोटे दावे करून विद्यापीठाने कोट्यवधी उकळले

    TRAI : बनावट SMS आणि फसवणूक रोखण्यासाठी ट्रायचा नवा नियम; व्यावसायिक SMS साठी प्री-टॅगिंग अनिवार्य

    Central Govt : केंद्र सरकारचा खासगी टीव्ही चॅनेल्सना कडक इशारा- संवेदनशील कंटेंट प्रसारित करू नका, दिल्ली स्फोट कव्हरेजमध्ये निष्काळजीपणा