• Download App
    “मै टीका लगाकर चली जाऊंगी, तुम देखते रही यो”; मध्य प्रदेशातले ट्रक ड्रायव्हर देताहेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा संदेश Rhyming two-line slogans are being written on trucks, tractors, and other vehicles in Bhopal as part of the administration's initiative to motivate people to get vaccinated against COVID-19

    “मै टीका लगाकर चली जाऊंगी, तुम देखते रही यो”; मध्य प्रदेशातले ट्रक ड्रायव्हर देताहेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा संदेश

    वृत्तसंस्था

    भोपाळ – सारा देश कोरोना महामारीशी झुंजत असताना समाजातला प्रत्येक छोटा – मोठा घटक त्यातला खारीचा वाटा उचलताना दिसतोय. अनेकजण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करीत आहेत. Rhyming two-line slogans are being written on trucks, tractors, and other vehicles in Bhopal as part of the administration’s initiative to motivate people to get vaccinated against COVID-19

    यामध्ये मध्य प्रदेशातील ट्रक चालकांनी पुढाकार घेतला आहे. ते आपल्या ट्रकवर फलक लावून आणि दोन ओळींच्या आकर्षक घोषणा रंगवून कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी जनतेला आवाहन करीत आहेत.



    या घोषणा ट्रकवरच्या नेहमीच्या बुरी नजरवाले तेरा मुँह काला सारख्याच आकर्षक आहेत. एका ट्रकवर प्रेयसी प्रियकराला म्हणतीये, मै टीका लगाकर चली जाऊंगी, तुम देखते रही यो…, तर दुसऱ्या ट्रकवर घोषणा रंगवून प्रियकर म्हणतोय, हंस मत पगली प्यार हो जाएगा, टीका लगवा ले कोरोना हार जाएगा…

    या घोषणा साध्या आहेत, पण जनसामान्यांच्या भावनांना हात घालणाऱ्या आणि त्यांच्यातला लसीकरणाविषयीचा गैरसमज दूर करणाऱ्या आहेत. देशात काही शहरे आणि गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पोहोचलेल्या टीमला जनतेच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातली ट्रकचालकांची जनजागृती मोहीम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

    Rhyming two-line slogans are being written on trucks, tractors, and other vehicles in Bhopal as part of the administration’s initiative to motivate people to get vaccinated against COVID-19

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य