• Download App
    पंजाब मध्ये केजरीवाल अटकेचा "रिव्हर्स इफेक्ट"; आम आदमी पार्टी फुटली एकमेव खासदार भाजपमध्ये!!|"Reverse Effect" of Kejriwal Arrest in Punjab; Aam Aadmi Party split, the only MP in BJP!!

    पंजाब मध्ये केजरीवाल अटकेचा “रिव्हर्स इफेक्ट”; आम आदमी पार्टी फुटली एकमेव खासदार भाजपमध्ये!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मनी लॉन्ड्री प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या भोवती विरोधक एकवटले असले तरी पंजाब मध्ये मात्र त्याचा “रिव्हर्स इफेक्ट” झाला आहे. पंजाब मध्ये आम आदमी पार्टी फुटून त्या पक्षाचे एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. त्यांच्याबरोबरच आमदार शितल अंगरूल यांनी देखील भाजपचे कमळ हाती धरले आहे.“Reverse Effect” of Kejriwal Arrest in Punjab; Aam Aadmi Party split, the only MP in BJP!!



    सुशील कुमार रिंकू हे आम आदमी पार्टीचे जालंधरचे खासदार होते. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जालंधरच्या जनतेला मी निवडणुकीत केलेले वादे पूर्ण करू शकलो नाही. कारण आम आदमी पार्टीने मला पुरेसा पाठिंबा दिला नाही, पण त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे मी भाजपचे कमळ हाती धरले आहे, असे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सांगितले.

    वास्तविक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अटक झाल्यानंतर सर्व विरोधक केजरीवाल यांच्या भोवती एकवटले आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना विरोधकांचे बळ प्राप्त झाले आहे, पण प्रत्यक्षात त्याचा “रिव्हर्स इफेक्ट” पंजाब मध्ये होऊन त्यांच्या आम आदमी पार्टीचा एकमेव खासदार त्यांची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाला आहे. त्याचबरोबर आमदार शितल अंगरूल यांनी देखील भाजपचेच कमळ हाती धरले आहे. त्यामुळे पंजाब मध्ये आम आदमी पार्टी फुटण्याचा सिलसिला सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे.

    “Reverse Effect” of Kejriwal Arrest in Punjab; Aam Aadmi Party split, the only MP in BJP!!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य